Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Police | नागपूर पोलिसांतर्फे सायक्लोथॉन, भर पावसात लुटला सायकलिंगचा आनंद, झिंगाट डान्सवर पोलीस नाचले

भर पावसामध्येच सायकल चालवण्याचा आनंद लुटला. शहराच्या वेगवेगळ्या भागातून ही सायकल रॅली निघाली. पोलीस लाईन टाकळी, शिवाजी मैदानावरून या रॅलीला सुरुवात झाली. पोलिसांशिवाय सुमारे साडेतीन हजार नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

Nagpur Police | नागपूर पोलिसांतर्फे सायक्लोथॉन, भर पावसात लुटला सायकलिंगचा आनंद, झिंगाट डान्सवर पोलीस नाचले
नागपूर पोलिसांतर्फे सायक्लोथॉन, भर पावसात लुटला सायकलिंगचा आनंद
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 4:51 PM

नागपूर : पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय स्थापित व्हावा, या दृष्टिकोनातून पोलिसांतर्फे आज नागपुरात सायकलोथॉनचं आयोजन करण्यात आलं. सायकल हे आरोग्याच्या (Health) दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. सायकल चालवल्याने शारीरिक व्यायाम चांगल्या पद्धतीने होतो. सोबतच पोलीस आणि नागरिक (Citizen) एकत्र असेल तर कुठलेही अडचणीचा सामना सहजरित्या केल्या जाऊ शकते. हा उद्देश समोर ठेवत पोलिसांनी हे आयोजन केलं. पाऊस सुरू होता. तेव्हा सायकल चालविण्यात पोलीस आनंद लुटत होते. झिंगाट डान्सवर नाचत होते. याचाही मनमुराद आनंद पोलिसांनी घेतला. जनता आणि पोलीस यांच्यातील संबंध वृद्धिंगत व्हावा, यासाठी हे आयोजन केल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) म्हणाले.

पाहा व्हिडीओ

पोलीस अधिकारीही झाले सहभागी

यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भाग घेतला. नागरिकांचासुद्धा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला. नागपुरात आज पहाटेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. अशा परिस्थितीमध्ये या सायक्लोथॉनमध्ये सहभागी होणाऱ्यांचा उत्साह मात्र कमी होताना दिसून आला नाही. भर पावसामध्येच सायकल चालवण्याचा आनंद लुटला. शहराच्या वेगवेगळ्या भागातून ही सायकल रॅली निघाली. पोलीस लाईन टाकळी, शिवाजी मैदानावरून या रॅलीला सुरुवात झाली. पोलिसांशिवाय सुमारे साडेतीन हजार नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा

nagpur police 1

विविध शस्त्रांचं प्रदर्शन

पोलीस जनतेसाठी काय करते याचं प्रदर्शन या ठिकाणी करण्यात आलं. पोलिसांचे वेगवेगळे शस्त्र जनतेला पाहता आले. यावेळी सायबर सेक्युरिटीचे लोकंही येथे होते. भर पावसात चांगलाच आनंद लुटला. महिला पोलिसांनीही झिंगाट डान्स केला. पोलिसांची शस्त्र, गांजा, भांग, चरस, कोकेना काय असतं, याचं प्रदर्शन करण्यात आलं. अंमली पथक विरोधी पथकाचं काम काय असतं, हेही या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला.

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.