सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करणे, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रकार, हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण

एखाद्या ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज करुन तो डिलीट करणं, हा गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

सोशल मीडियावरील पोस्ट डिलीट करणे, म्हणजे पुरावा नष्ट करण्याचा प्रकार, हायकोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण
मुंबई उच्च न्यायालयाचं नागपूर खंडपीठ
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 8:35 AM

नागपूर : एखाद्या ग्रुपवर आक्षेपार्ह मेसेज करुन तो डिलीट करणं, हा गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार असल्याचं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे. एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

सोशल मीडियावर बऱ्याच वेळा एखादा मेसेज करुन तो डिलीट करण्याची अनेकांना सवय असते. असं करण्याने समोरच्याकडे आपला मेसेज राहत नाही किंबहुना आपण बोलल्याचा पुरावा नष्ट होतो. याच विषयावरचं न्यायालयाचं हे महत्त्वाचं निरीक्षण आहे.

मेसेज डिलीट करणं हा गुन्ह्यातील पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार

‘सोशल मिडियावर एखाद्या धर्माविषयी आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यानंतर तो मेसेज डिलीट करणे हा एकप्रकारे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार आहे, त्यामुळे अशा स्वरूपाचा गुन्हा रद्द करता येत नाही’, असं मत सोशल मिडियावरील पोस्ट बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवलं आहे.

नागपूर जिल्ह्यातील जफर अली शेर अली सैय्यद यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवलंय. निरीक्षण नोंदवताना मेसेज डिलीट करणे हा एकप्रकारे पुरावा नष्ट करण्याचाच प्रकार आहे, त्यामुळे अशा स्वरूपाचा गुन्हा रद्द करता येत नाही’, अशी कमेंटही न्यायालयाने केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपीने 2019 मध्ये कन्हान येथे दुर्गा उत्सवादरम्यान परिसरातील लोकांचा एका व्हॉट्सअ‍ॅप समूह तयार करण्यात आला होता. त्या समूहावर जफर अलीने दुखावणारी धार्मिक पोस्ट केली होती. त्यामुळे समूहातील दुसरे सदस्य मनीष सिंह यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणावर सुनावनी करताना, उच्च न्यायालयाने महत्त्वाचं निरीक्षण नोंदवत गुन्हा रद्द करण्यास नकार दिलाय.

(Deleting a message is a form of destroying evidence in a crime, an important observation of Nagpur Bench of Mumbai High Court)

हे ही वाचा :

जान मोहम्मदला लहानपणापासून ओळखतो, परवाच एकत्र चहा झाला, संशयित दहशतवाद्याच्या अटकेनंतर मित्रांना धक्का

देशात बॉम्बस्फोट घडवण्याचा कट, मुंबईच्या जान शेखला राजस्थानमधून अटक, कुटुंबीय पोलिसांच्या ताब्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.