खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं

अमृता फडणवीसही (Amruta Fadnavis) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार बरसल्या. तसं अनेकदा अमृता फडणवीस ट्विटरवरून महाविकास आघाडीवर वारंवर निशाणा साधत असतात. मात्र टीका करण्याचा आणि आरोप करण्याचा पत्नी-पत्नीचा योग चांगलाच जळून आला होता.

खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं
अमृता फडणवीसांची पुन्हा महाविकास आघाडीवर टीकाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:09 PM

मुंबई : गुरूवारच्या विधानसभेतील भाषणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आरोपांची मोठी फाईल उघडली. एकापाठोपाठ एक एवढे आरोप केले की महाविकास आघाडीच्या नेत्यांना सभागृहात डोकं पकडायची वेळ आली असेल. फडणवीस बोलून काही मिनिटच झाली होती. तेवढ्यात अमृता फडणवीसही (Amruta Fadnavis) महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) जोरदार बरसल्या. तसं अनेकदा अमृता फडणवीस ट्विटरवरून महाविकास आघाडीवर वारंवर निशाणा साधत असतात. मात्र टीका करण्याचा आणि आरोप करण्याचा पत्नी-पत्नीचा योग चांगलाच जळून आला होता. महाविकास आघाडीवर भ्रष्टाचारापे आरोप करताना, खाऊंगा भी, खिलाऊंगा भी और खानेवालो को सुरक्षा भी दूंगा, असेच काहीसे महाराष्ट्राचे सध्याचे वातावरण आहे. म्हणत त्यांनी पुन्हा महाविकास आघाडीला चिमटे काढले आहेत.

केंद्रीय तपास यंत्रणा निष्पक्ष

मात्र हे आता बंद झाले पाहिजे. महाराष्ट्राच्या नागरिकांना महाराष्ट्रात विकासाचं राजकारण हवा आहे. भ्रष्टाचार बंद झालाच पाहिजे, असे अमृता फडणवीसांनी ठणकावले आहे. जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणा तपास करतात. तेव्हा त्यांच्याकडे पुरावे असतात. तेव्हाच ते कारवाई करतात आणि ते निष्पक्ष पद्धतीनेच तपास करतात, असे सर्टीफिकटही त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांना देऊन टाकले. आता आपण आता बोलून काही उपयोग नाही. या सर्व चौकशांचा अंतिम निष्कर्ष समोर आल्यावर कळेलच, असेही त्या म्हणाल्या. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. या सर्व कारवाई सुडाच्या भावनेतून सुरू आहेत, असा आरोप महाविकास आघाडीकडून वारंवर करण्यात येत आहे. त्यालाच अमृता फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

फडणवीसांचीही जोरदार फटकेबाजी

मुंबईमध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे. मुंबई महापालिकेत जे सत्ता चालवत आहेत ते महापालिकेला सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजतात. देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेचं आणि ज्यांचा क्रमांक देशात आठवा आहे. त्यांचा फायनान्सियल रिसोर्स मॅनेजमेंटचा आकडा 45 वर आहे. आपल्यापुढे नवी मुंबई, पुणे, नागपूरसुद्धा आहे. कशाप्रकारे महापालिकेचं बजेट लुटून नेण्याचं काम सुरु आहे. मुख्यमंत्र्यांचं भाषण छोटं होतं पण छान होतं. ते म्हणाले की गरीब, गरजू, कामगारांना द्यायचं आहे पण इथं फक्त लुटीचं काम सुरु आहे. असे म्हणत फडणवीसांनी सुरूवातील जोरदार हल्लाबोल चढवला.

Devendra Fadnavis: ही हिंमत, अजित पवारांबद्दल, तीही पुण्यात? फडणवीसांनी ती घटना पुन्हा सभागृहात सांगितली

Devendra Fadnavis: ‘दादांचीही’ नसेल एवढी… बारामती ते मुंबईपर्यंत प्रॉपर्टी घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची कुंडली फडणवीसांनी मांडली, मलिक कनेक्शन?

Breaking News: मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, सेना आमदाराच्या मागणीवर निर्णय

...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.