लव्ह जिहाद,आंतरधर्मीय विवाहाबाबत राज्य सरकार काय निर्णय घेणार, उपमुख्यमंत्र्यांनी सगळं चित्रच स्पष्ट केलं..
लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा केरळ राज्यात कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी या गोष्टीला लव्ह जिहाद हे नाव कसे दिले त्याचाही इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.
नागपूरः दिल्लीत श्रद्धा वालकर यांची हत्या झाल्यानंतर आंतरधर्मीय आणि लव्ह जिहादच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले होते. त्यातच आंतरधर्मीय विवाहाबाबत कायदा करण्यासंदर्भात सरकार विचार करत असल्याचे सांगितल्यानंतर विरोधकांनी त्याविरोधात जोरदार आवाज उठवला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही या प्रकरणी सरकारला धारेवर धरले होते.
त्यावरूनच आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी या कायद्याविषयी सवाल उपस्थित केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लव्ह जिहाद आणि आंतर धर्मीय विवाहाविषयीच्या कायद्या करण्याविषयी सरकार काय विचार करत आहे त्याबाबतही त्यांनी स्पष्ट सांगितले.
लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, लव्ह जिहाद कायद्या संदर्भात काही राज्यांनी स्वतंत्र कायदे केले आहेत. हे कायदे करण्या पाठीमागे कोणत्याही महिलेची फसवणूक होऊ नये, कोणतीही महिला षडयंत्राला बळी पडता कामा नये यासाठी अशा कायद्यांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
लव्ह जिहाद कायद्याविषयी बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी हा कायदा केरळ राज्यात कम्युनिस्ट विचारसरणीचे मुख्यमंत्री असताना, त्यांनी या गोष्टीला लव्ह जिहाद हे नाव कसे दिले त्याचाही इतिहास त्यांनी यावेळी सांगितला.
त्यामुळे हा कायदा करत असताना कोणत्याही धर्माला अथवा व्यक्तीला विरोध म्हणून कायदा केला जात नाही तर कोणत्याही महिलांची षडयंत्र आखून त्यांची फसवणूक केली जाऊ नये यासाठी हा कायदा करण्याचा विचार सरकार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
लव्ह जिहादविषयी देशातील अनेक राज्यात कायदे करण्यात आले आहेत. त्या कायद्यांचा अभ्यास करून त्यासाठी वेगळा काही कायदा करण्याचा विचार करत आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.