Nagpur Medical : मेडिकलच्या दंत महाविद्यालयात डिजीटलायझेशन, ओपीडीमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा

व्हर्च्युअल लॅबसाठी स्टिम्युलेटरची गरज भासणार आहे. या यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली. हाफकीनकडून निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे.

Nagpur Medical : मेडिकलच्या दंत महाविद्यालयात डिजीटलायझेशन, ओपीडीमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधा
ओपीडीमध्ये ऑनलाईन पेमेंटची सुविधाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 4:51 AM

नागपूर : मेडिकलमधील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय डिजिटलायजेशनच्या दिशेने वळत आहे. या सुविधेचा फायदा येथील रुग्णांसोबतच शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनाही मिळत आहे. रुग्णांकडे सुटे पैसे नसल्यास अडचणी येत होत्या. त्यावर उपाय शोधण्यात आला. ओपीडीमध्ये ऑनलाईन पेमेंटची (Online Payment) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. ही सुविधा रुग्णांसाठी फारच सोयीची सिद्ध होत आहे. हिशोब ठेवणेही सोयीचे झाले आहे. याशिवाय दंतमध्ये आता एक्सरे फिल्मऐवजी डिजिटल एक्सरे (Digital Xray) सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही सुविधा उपलब्ध झाल्यास रुग्ण आणि डॉक्टरांसाठीही (Doctor) ते सोयीचे ठरणार आहे. याशिवाय पूर्वी अधिष्ठातांच्या पार्किंगसाठी असणार्‍या जागेत नवा विभाग सुरू करण्यात आला आहे.

दोन डिजीटल वर्गखोल्या तयार

एका रुग्णावर एकच डॉक्टर सर्व उपचार पूर्ण करील, असा प्रयत्न या विभागात केला जात आहे. तसेच येथे आता लवकरच व्हर्च्युअल लॅब व स्किल लॅबही साकारली जाणार आहे. त्यामुळे भावी दंत चिकित्सकांना अधिक बारकाव्यांसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करता येणार आहे. दंतकडून आणखी नवे विभाग सुरू करण्यावरही भर दिला जात आहे. महाविद्यालयाची नवी इमारत उभी राहत आहे. या ठिकाणी सुपरस्पेशालिटी उपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याची तयारीही आतापासूनच सुरू आहे. स्वाध्याय एक व स्वाध्याय दोन अशा दोन डिजिटल वर्गखोल्या तयार आहेत.

सहा महिन्यांत व्हर्च्युअल लॅब

व्हर्च्युअल लॅबसाठी स्टिम्युलेटरची गरज भासणार आहे. या यंत्र खरेदीला प्रशासकीय मान्यता मिळाली. हाफकीनकडून निविदा प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे पुढील सहा महिन्यांत व्हर्च्युअल लॅब कार्यान्वित होईल. यामुळं विद्यार्थ्यांना स्क्रिनवर प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून पाहता येईल. प्रत्यक्ष क्लिनिकल सरावापूर्वी विद्यार्थ्यांना काही सराव करावे लागतात. अशावेळी ही सुविधा उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांना अधिक बारकाव्यासह अभ्यास पूर्ण करता येणार आहे. अधिक चांगले दंत चिकित्सक तयार होण्यास मदत होईल. स्किल लॅबमुळेही बाहेरून प्रशिक्षणासाठी येणार्‍यांना लाभ मिळू शकेल.

हे सुद्धा वाचा

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.