Nagpur Crime | अलविदा स्टेटस ठेऊन डॉक्टरने स्वत:ला संपविले, स्वत:च रुग्णालयात टोचले इंजेक्शन, चिठ्ठीमध्ये लिहिले मृत्यूचे कारण
अलविदा जिंदगी, असा व्हॉट्सअपवरील स्टेटस ठेऊन नागपुरात एका अडतीस वर्षीय डॉक्टरने स्वतःला ( Doctor's ends life) संपविले. रुग्णालयातच ड्युटीवर असताना इंजेक्शन टोचून जीवन संपविले. यामागचे कारण त्याने नोटमध्ये लिहिले.
नागपूर : सेंट्रल एव्हेन्यूवरील एका खासगी रुग्णालयातील अडतीस वर्षीय डॉक्टरने संपविले (Doctor’s ends life) केली. स्वतःला विशिष्ट प्रकारचे इंजेक्शन टोचून जीवन संपविले. शुक्रवारी सकाळी ही घटना उघकीस आली. शहरातील वैद्यकीय वतुर्ळात प्रचंड खळबळ उडाली आहे. डॉ. अभिजीत रत्नाकर धामनकर (Abhijeet Dhamankar) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. ते राऊत चौक लालगंजमध्ये राहत होते. पहिल्या पत्नीला त्यांनी घटस्फोट (Dr. divorced his wife) दिला होता. 2017 मध्ये विशाखा गायकवाड यांच्याशी लग्न केले होते. त्यांना एक वर्षांचा मुलगा आहे. सासरच्यांचा हस्तक्षेप वाढला होता. त्यामुळं त्यांच्या घरचे वातावरण बिघडले होते. पत्नी माहेरी निघून गेली होती. घरगुती वादातून हे पाऊल उचलल्याचं अभिजीत यांनी चिठ्ठीत लिहून ठेवले.
अशी घडली घटना
गुरुवारी त्यांची रात्रपाळी होती. रात्री दहा वाजता कर्तव्यावर गेले. भरती असलेल्या रुग्णांची तपासणी केली. त्यानंतर रात्री आपल्या रुममध्ये आराम करण्यासाठी निघून गेले. एका रुग्णांची प्रकृती बिघडली. त्यामुळं रात्री तीन वाजता परिचारिकेने त्यांना आवाज दिला. पण, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. जवळ जाऊन पाहिले असता डॉक्टर अभिजीत यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. परिचारिकेने संचालकांसह इतर डॉक्टरांना घटनेची माहिती दिली.
चिठ्ठीमध्ये लिहिले मृत्यूचं कारण
पोलिसांना कळविण्यात आले. तसेच अभिजीत यांच्या नातेवाईकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली. पहाटे पाचच्या सुमारास अभिजीत यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. अभिजीत यांच्या खिशात पोलिसांना नोट सापडली. त्यामध्ये सीमा गायकवाड, विनय गायकवाड, राहुल लोखंडे यांच्या त्रासामुळं जीवन संपवित असल्याचे लिहून ठेवले. गणेशपेठ पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. संबंधितांची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितलं. गेल्या आठवड्यात अभिजीत याच्याविरुद्ध पत्नीकडून हुंड्यासाठी छड होत असल्याची तक्रार दाखल झाली होती. पण, हे सर्व खोटे असल्याचं अभिजीत यांनी सांगितले होते. तरीही अभिजीत यांच्याविरोधात अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला होता. शेवटी मोबाईलवर अलविदा असा स्टेटस ठेवून अभिजीत यांनी जगाचा निरोप घेतला.