Nagpur Crime | डॉक्टरला लागले दारुचे व्यसन, नागपुरात मद्यधुंद अवस्थेत घेतला गळफास; कौटुंबिक कलह कारणीभूत?

सुमन विहार निवासी डॉ. कोमल सिंह ठाकूर हे चौधरी रुग्णालयात कार्यरत होते. दारुच्या आधीन गेल्याचे त्यांच्याबाबत सांगण्यात येते. या दारुच्या कारणावरूनच त्यांच्या घरात कौटुंबिक कलह होत होता. हाच कलह मागील काही दिवसांपासून सुरू होता. परिणामी ठाकूर यांची शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पत्नीसोबत वाद झाला

Nagpur Crime | डॉक्टरला लागले दारुचे व्यसन, नागपुरात मद्यधुंद अवस्थेत घेतला गळफास; कौटुंबिक कलह कारणीभूत?
नागपुरात मद्यधुंद अवस्थेत घेतला गळफासImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 1:19 PM

नागपूर : नागपुरात शहरातील कपिलनगर (Kapilnagar) पोलीस ठाणे हद्दीत डॉक्टराने गळफास घेतला. मद्यधुंद अवस्थेत डॉक्टराने गळफास घेतल्याची माहिती आहे. डॉक्टरच्या घरी सुरू असलेल्या कौटुंबिक कलहातून (Family quarrel) हा गळफास घेतल्याचं सांगितलं जातंय. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. डॉ. कोमल सिंह ठाकूर (वय 45) असे मृतक डॉक्टराचे नाव आहे. डॉ. कोमल ठाकूर (Komal Singh Thakur) यांना दारूचे व्यसन जडले होते. या नशेतच त्यांनी आत्महत्या केल्याचेही सांगण्यात येत आहे. या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत. मृतदेहाला शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

घरी पत्नी व मुलगा

प्राप्त माहितीनुसार, सुमन विहार निवासी डॉ. कोमल सिंह ठाकूर हे चौधरी रुग्णालयात कार्यरत होते. दारुच्या आधीन गेल्याचे त्यांच्याबाबत सांगण्यात येते. या दारुच्या कारणावरूनच त्यांच्या घरात कौटुंबिक कलह होत होता. हाच कलह मागील काही दिवसांपासून सुरू होता. परिणामी ठाकूर यांची शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पत्नीसोबत वाद झाला. त्यानंतर ते एका खोलीत गेले. येथे त्यांनी सिलिंग फॅनला गळफास घेतला. या घटनेची माहिती कपीलनगर पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतक डॉक्टरच्या कुटुंबात पत्नी आणि एक मुलगा आहे.

नेमकं काय घडलं

कोमल सिंह यांना गेल्या काही दिवसांपासून दारुचे व्यवस लागले होते. त्यामुळं घरी पत्नीशी त्यांची भांडण होत होती. घटनेच्या दिवशी कोमल सिंह हे मद्यपान केले असल्याची माहिती आहे. त्यातून पत्नीशी भांडण झाल्यानंतर ते खोलीत गेले. तिथं त्यांनी स्वतःला गळफास लावून घेतला. यात त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छदेनासाठी पाठविता. यातून त्यांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येईल.  माणूस कोणताही असो. तो दारुच्या आहारी गेला की, त्याला दारू गिळंकृत करते. त्यातून तो काहीतरी चुकीचं करतो, असंच या डॉक्टरच्या बाबतीत झालं असावं. त्यामुळं दारू पिणाऱ्यांनी या दारूचा तारतम्यानं वापर करणं गरजेचं आहे.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.