AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी

सोशल मिडियाचा अतिवापर करणे यामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत तयार होत आहे. मागील पाच महिन्यात 704 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. (social media excessive use nagpur)

मोबाईल, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत, पाच महिन्यात तब्बल 704 तक्रारी
SOCIAL MEDIA USE
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 6:40 PM
Share

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तसेच लॅाकडाऊनच्या काळात मोबाईलच्या अतिवापराचे प्रमाण वाढल्याचे समोर आले आहे. घरात असताना जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर राहणे, चॅटिंग करणे, सोशल मिडियाचा अतिवापर करणे यामुळे कुटुंबामध्ये संशयाचं भूत तयार होत आहे. याच मोबाईलने अनेकांच्या सुखी संसारात विष कालवलंय. तशा अनेक तक्रारी नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे दाखल करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार भरोसा सेलकडे मागील पाच महिन्यात 704 तक्रारी, तर दोन महिन्यांत 236 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. (excessive use of Social Media lead to family problems between husband and wife in Nagpur)

मोबाईलच्या अतिवापरामुळे पती-पत्नीत वितुष्ट

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोविड नियंत्रणासाठी सरकारने लॅाकडाऊनसदृश निर्बंध जाहीर केले. या काळात लोक घरामध्येच होते. त्यामुळे घरात असल्यामुळे लोकांचे मोबाईल तसेच सोशल मिडिया वापरण्याचं प्रमाण वाढलं. परिणामी मोबाईलवर जास्त वेळ घालवणे किंवा सोशल मिडियाचा अतिवापर हा सुद्धा वाढला. परिणामी पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाले. तशा घटनांचे प्रमाण या काळात वाढले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे पती-पत्नीमध्ये वितुष्ट निर्माण होत आहे. तशा काही तक्रारी आल्या आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे दाम्पत्यामध्ये संशयसुद्धा निर्माण होत आहेत. नागपूर पोलिसांच्या भरोसा सेलकडे मागील पाच महिन्यात 704 तक्रारी दाखल करण्यात आल्या. यामध्ये 236 तक्रारी या मागच्या दोन महिन्यांतील आहेत.

मोबाईलच्या अती आणि गैरवापरामुळे समस्या- तज्ज्ञ

नागपुरात पोलिसांच्या भरोसा सेलकडे गेल्या पाच महिन्यात 704 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींचे विश्लेषण सोशल मिडिया तज्ज्ञांनी केले आहे. मोबाईलचा अतिवापर त्याला कारणीभूत असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. याविषयी बोलताना मोबाईलचा हा सुखी संसारात विष कालवत नसून, याला लोकांची मानसिकता जबाबदार आहे. मोबाईलचा प्रमाणाबाहेर वापर करणे यामुळे ही समस्या निर्माण झालीय. असं सोशल मिडिया तज्ज्ञ अजित पारसे यांनी सांगितलं आहे.

पती-पत्नीने एकमेकांना वेळ द्यावा

दरम्यान, या समस्यांपासून सुटका करुन घ्यायची असेल, तसेच सुखी संसार हवा असेल तर घरात असताना मोबाईलचा अतिवापर करणे थांबवायला हवे. तसेच मोबाईलच्या वापरातून निर्माण झालेले गैरसमज दूर करावे. एकमेकांवर विश्वास दाखवावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. विशेष म्हणजे घरी असल्यानंतर पती-पत्नीने एकमेकांना वेळ द्यावा. या सर्व गोष्टींमुळे मोबाईलच नाही तर दुसरी कोणतीही गोष्ट सुखी संसारात विष कालवू शकणार नाही, असेही तज्ज्ञांनी सांगितलेय.

इतर बातम्या :

…आणि संजय दत्त अचानक मंत्री नितीन राऊत यांच्या भेटीला नागपूरच्या घरी

Corona Vaccine : नागपुरात लहान मुलांवर कोरोना लसीची चाचणी होणार, संपूर्ण राज्याचं लक्ष

इंटर मॉडेल स्टेशनसाठी तब्बल 40 हजार झाडांची कत्तल, नागपुरात वृक्षप्रेमींचा कडाडून विरोध

(excessive use of Social Media lead to family problems between husband and wife in Nagpur)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.