Nagpur Police | मालकाच्या नावाचा बनावट मेल; पैसे तिसऱ्याला पाठवायला सांगितले, फेक अकाउंट निघाल्याने अडचण
बनावट इ मेलच्या आधारे पैसे मागवून फसवणूक करण्यात आली. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरुपाचा होता.
नागपूर : नागपुरातील कंपनीचे काम करत असताना दिल्लीतील मालकाच्या (Delhi Owner) नावाने एक इ मेल आला. त्या मेलमधून चार लाख ऐंशी हजार रुपये तिसऱ्या व्यक्तीला द्या, मेसेज होता. मालकाच्या नावाचा मेल असल्यानं कर्मचाऱ्यांनी लगेच रक्कम वळती केली. मेलमध्ये दिलेल्या अकाउंटवर रक्कम वळती करण्यात आली. पण, ज्या मेलवरून माहिती देण्यात आली होती तो मेल आयडी फेक (ID Fake) असल्याचे लक्षात आले. बनावट इ मेलच्या आधारे पैसे मागवून फसवणूक करण्यात आली. सदर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. या गुन्ह्याचा तपास तांत्रिक स्वरुपाचा होता. त्यामुळं सायबर पोलीस ( Cyber Police ) ठाण्यात वर्ग करण्यात आला होता.
दिल्लीला जाऊन आरोपींना आणले
हा तपास करताना असताना या गुन्ह्यामध्ये ज्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर झाले होते. त्या अकाउंटची आणि त्याच्याशी संबंधित मोबाईल नंबर आणि इतर तांत्रीक बाबी तपासण्यात आल्या. सायबर पोलीस ठाण्यातील पोलीसांनी आरोपींना ताब्यात घेतले. ते आरोपी दिल्ली येथील असल्याचे निदर्शनात आले. एपीआय रामकृष्ण पाटील, पोलीस अंमलदार अजय, पोलीस अंमलदार ठाकूर हे दिल्ली येथे गेले. त्यांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं.
दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
आरोपी विशाल ठाकूर व कुलवींदरसिंग यांना दिल्लीहून नागपुरात आणण्यात आले. अशी माहिती सायबर सेलचे नितीन फटांगले यांनी दिली. नागपुरातील न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का, हे तपासण्याचे काम सुरू आहे. हे दोघेच आरोपी होते की, आणखी कुणी आहेत, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. पण, सायबर पोलिसांनी तांत्रीक तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या एवढे मात्र खरे.