अमरावती जिल्ह्यात शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, गेल्यावर्षी 361 आत्महत्या, आकडेवारी जाहीर

अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२१ मध्ये एकूण ३६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी २२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पोलिसांनी चौकशीअंती पात्र केल्या आहेत तर ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अपात्र ठरल्या आहेत.

अमरावती जिल्ह्यात शेतक-यांच्या मृत्यूचे सत्र सुरूचं, गेल्यावर्षी 361 आत्महत्या, आकडेवारी जाहीर
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 09, 2022 | 1:06 PM

अमरावती – शेती कर्जाला कंटाळून किंवा इतर अनेक कारणांनी आत्महत्या करण्याचं प्रमाण अधिक असल्याचं पुन्हा सिध्द झालं आहे. देशभरात अशा अनेक ठिकाणी आत्महत्या होत असतात. काहीवेळेला तर अधिक शुल्लक कारणावरून आत्महत्या केल्या जातात असं स्पष्ट झालं आहे. अमरावती (amravati) जिल्ह्यामध्ये 2021 सालामध्ये आत्तापर्यंत 361 आत्महत्या झाल्या असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक घटनेत वेगळं कारण आहे, तसेच अनेक ठिकाणी झालेल्या आत्महत्येचं कारण अद्याप पोलिसांना (amravati police) स्पष्ट करण्यात आलेलं नाही असं जाहीर झालेल्या यादीवनरून स्पष्ट होतंय. 2021 मध्ये झालेल्या 361 आत्महत्यांपैकी 226 शेतक-यांनी आत्महत्या (Farmer suicide) केल्याचं स्पष्ट झालंय. तसेच 75 आत्महत्या या अपात्र ठरल्याचं यादीवरून स्पष्ट होतंय. तसेच 60 शेतक-यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सिध्द झालं आहे. गेल्यावर्षी सगळ्यात जास्त आत्महत्या या ऑगस्ट महिन्यात झाल्या असल्याचे यादीवरून स्पष्ट होत आहे. हे आत्महत्याचं सत्र केव्हा संपणार असा प्रश्न तेथील स्थानिकांना पडला आहे. कारण आत्महत्या केलेल्या घरची परिस्थीती अत्यंत बेताची असल्याचे वारंवार समोर आले आहे. तसेच सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचे प्रमाण देखील अधिक असल्याचे तेथील स्थानिकांचे म्हणणे आहे.

आत्महत्येचं कारणं

आजतागायत आत्महत्या झालेल्या आपण पाहिल्या आणि किंवा ऐकल्या आहेत. पण त्यामागची कारण कधी जाणून घेतली असं झालं नसेल. कारण घटनांमध्ये असं जाणवतं की कर्जाला कंटाळू किंवा आजाराला, बेरोजगारी, घरातील एखाद्या किरकोळ कारणावरून आत्महत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे. अशा कारणांमुळे अधिक आत्महत्या आत्तापर्यंत झाल्या आहेत. तसेच गेल्यावर्षी 361 आत्महत्या झाल्या त्यापैकी अनेक आत्महत्या झाल्या नसल्याचा पोलिसांनी संशय आहे. तसेच काही आत्महत्यांची चौकशी सुरू आहे.

आकडेवारीतली माहिती

अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षी २०२१ मध्ये एकूण ३६१ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, त्यापैकी २२६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या पोलिसांनी चौकशीअंती पात्र केल्या आहेत तर ७५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या अपात्र ठरल्या आहेत. ६० शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चौकशी अद्याप पोलिसांकडून प्रलंबित आहेत. २०२१ वर्षातील महिनानिहाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विचार केला असता, सर्वात जास्त आत्महत्या ऑगस्ट महिन्यात झाल्या आहेत. या महिन्यात ४२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. त्यापैकी ३० शेतकऱ्यांच्या आत्महत्या पात्र असून, ८ आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तर ४ प्रकरणाची चौकशी अद्याप प्रलंबित आहे. तसेच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र अद्यापही थांबत नसून, नव्या वर्षाच्या २०२२ च्या पहिल्या महिन्यातच जानेवारीत तब्बल २२ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे . ह्या २२ ही आत्महत्यांची चौकशी प्रलंबित आहे.

Nagpur Crime | नागपुरात पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या; रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले

‘महाराष्ट्र एक्स्प्रेस’वर राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती; नागपुरात रेल्वेने वेधले प्रवाशांचे लक्ष

Nagpur NMC | नेहरूनगर झोनमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जागेचा प्रश्न मनपाने कसा मिटवला?

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.