Agri-Tourism | आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त सोमवारी शेतकऱ्यांचा गौरव! राज्य पर्यटन संचालनालय व एटीडीसीचा खास उपक्रम

या नव्याने व वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. याची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास महामंडळाने केलेले आहे.

Agri-Tourism | आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त सोमवारी शेतकऱ्यांचा गौरव! राज्य पर्यटन संचालनालय व एटीडीसीचा खास उपक्रम
राज्य पर्यटन संचालनालय व एटीडीसीचा खास उपक्रमImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: May 15, 2022 | 6:05 AM

नागपूर : आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Maharashtra Tourism Directorate) व कृषी पर्यटन विकास महामंडळाच्या (Agri-Tourism Development Corporation) संयुक्त विद्यमाने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण केंद्र (Yashwantrao Chavan Center) येथे सोमवार, 16 मे रोजी सकाळी 10 कृषी पर्यटन विकासाशी संबंधित विविध कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. कार्यक्रमात एका विशेष पुरस्कार सोहळ्याचे देखील आयोजन केलेले आहे. राज्यातील नावीन्यपूर्ण पद्धती वापरून यशस्वीरित्या कृषी पर्यटनाला चालना देणाऱ्या प्रयत्नांना व कल्पनांना या कार्यक्रमात पुरस्कृत केले जाईल. कृषी पर्यटन विकास हे करिअरचे अनोखे क्षेत्र ठरू शकते. म्हणूनच या क्षेत्रातील विविध पैलूंची माहिती इच्छुकांपर्यंत पोहचवणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य आहे. विविध क्षेत्रातील मार्गदर्शक, या कार्यक्रमात पर्यावरणपूरक उपक्रम आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये कृषी पर्यटनाची भूमिका अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत.

कृषी पर्यटनात रोजगाराच्या संधी

या नव्याने व वेगाने विकसित होणाऱ्या व्यवसायात अनेक नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध आहेत. याची माहिती करून घेण्यासाठी अधिकाधिक तरुणांनी या कार्यशाळेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पर्यटन विभाग व कृषी पर्यटन विकास महामंडळाने केलेले आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अदिती तटकरे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंग, एमटीडीसी व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन संचालनालयाचे संचालक मिलिंद बोरीकर आणि सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच कृषी पर्यटन विकास महामंडळ (एटीडीसी) चे सदस्य पांडुरंग तावरे यांच्यासह सर्व विभागातील शेतकरी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत.

कृषी पर्यटन केंद्रधारकांनी उपस्थित राहावे

आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिनी 16 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता नरिमन पॉईंट मुंबई येथील यशवंतराव चव्हाण केंद्र येथे नागपूर विभागातील सर्व नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्रधारकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...