Feeling very cool | नागपूरकरांनाे काश्मीर, उटी, शिमल्याचा आनंद घ्या, पारा नीचांकी 7.8 डिग्रीवर
चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात तब्बल सहा अंशांची घट झाली. पारा नीचांकी 7.8 डिग्रीवर आला. विदर्भातच नव्हे, राज्यात रविवारची रात्र सर्वाधिक थंड राहिली.
नागपूर : उत्तर भारतात थंडी वाढली. तापमान घसरले. या भागातील तापमान शून्याच्या खाली आलं. याचा परिणाम विदर्भातील तापमानावर झाला आहे. नागपुरात (Nagpur) काल पारा नीचांकी 7.8 डिग्री नोंदविला गेला. त्यामुळं नागपूरकरांना काश्मीर (Kashmir), उटी, शिमल्याचा आनंद आता नागपुरातच घेता येणार आहे. या हिवाळ्यात सर्वात थंड (very cool) दिवसाची नोंद झाली आहे.
आणखी दोन दिवस चांगलीच थंडी
अर्धा हिवाळा संपला. पण, अद्याप पाहिजे तशी थंडी पडत नव्हती. यंदा थंडी कमी पडते की, काय असं वाटत होतं. पण, काल अचानक वातावरण बदलून कडाक्याची थंडी जाणवली. चोवीस तासांत नागपूरच्या तापमानात तब्बल सहा अंशांची घट झाली. पारा नीचांकी 7.8 डिग्रीवर आला. विदर्भातच नव्हे, राज्यात रविवारची रात्र सर्वाधिक थंड राहिली. विदर्भात आणखी दोन दिवस थंडीची तीव्र लाट राहणाराय. प्रादेशिक हवामान विभागातर्फे तसं सांगण्यात आलंय.
किमान तापमानात सहा डिग्रीची घसरण
उत्तर भारतातील पहाडी भागांत जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळं विदर्भात सध्या कडाक्याची थंडी जाणवत आहे. लाटेचा सर्वाधिक प्रभाव नागपुरात दिसून आला. गेल्या चोवीस तासांत नागपूरच्या किमान तापमानात सहा डिग्रीची घसरण झाली. तापमानाचा पारा 13.4 वरून 7.8 डिग्रीवर आला. विदर्भासह राज्यातही सर्वात कमी तापमानाची नोंद नागपुरातच झाली.
विदर्भातही पारा घसरला
गेल्या वर्षी याच दिवशी नागपूरचे किमान तापमान 8.6 पर्यंत घसरले होते. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त थंडी आहे. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरखालोखाल अमरावती येथे 8, गोंदिया येथे 8.2 आणि वर्धा येथे 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील इतरही जिल्ह्यांमध्ये थंडीची तीव्र लाट आहे.
दोन दिवसांनंतर ओसरेल थंडीची लाट
आणखी दोन उत्तर भारतात थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर थंडीची लाट कमी होईल. विदर्भातही पारा कमी होईल. त्यामुळं सध्याच्या थंडीत काश्मीर, उटी, शिमल्याला गेल्याचा अनुभव घ्या. मस्त थंडी एन्जाय करा. लहान मुलं आणि ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या.