कृषीपंपधारकांसाठी सुवर्णसंधी! थकबाकीची पन्नास टक्के रक्कम भरा, तारखेचं काय आहे गणित?

कृषीपंपाच्या थकीत असलेल्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्यासाठी एक संधी आहे. यासाठी फक्त पस्तीस दिवस उरले आहेत. थकबाकीच्या पन्नास टक्के रक्कम त्यासाठी भरावी लागणार आहे. तसेच पूर्ण चालू वीजबिल येत्या 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कमही माफ करण्यात येत आहे.

कृषीपंपधारकांसाठी सुवर्णसंधी! थकबाकीची पन्नास टक्के रक्कम भरा, तारखेचं काय आहे गणित?
mahavitaran-
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 7:56 AM

नागपूर : वीजबिलांच्या दुरूस्तीमधून आतापर्यंत तीनशे कोटी 24 लाख रुपयांचे समायोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांकडे वीजबिलांपोटी तीस हजार 705 कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यापैकी पन्नास टक्के थकबाकी 31 मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित 50 टक्के म्हणजे रुपयांची माफी मिळणार आहे. वीजबिलांबाबत तक्रार (Complaint regarding electricity bills) किंवा शंका असल्यास कृषीपंपधारकांनी त्याचे निराकरण करावे. या योजनेचा लाभ सर्व थकबाकीदारांनी घ्यावा, असे आवाहन व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल (Managing Director Vijay Singhal) यांनी केले आहे. कृषीपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्ती योजनेला (Arrears Relief Scheme ) चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवार 23 फेब्रुवारीपर्यंत 21 लाख 79 हजार 816 शेतकर्‍यांनी चालू वीजबिल व थकबाकीची काही रक्कम भरली. त्यांना सहा हजार 769 कोटी 50 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे.

राज्यातील चार लाख शेतकऱ्यांनी भरले वीजबिल

आतापर्यंत सुधारित थकबाकीची एकूण पन्नास टक्के रक्कम व चालू वीजबिल भरण्यात आले. राज्यातील तीन लाख 97 हजार 199 शेतकर्‍यांनी वीजबिल संपूर्णपणे भरले आहे. त्यांना उर्वरित पन्नास टक्के थकबाकीची 571 कोटी 88 लाख रुपयांची सवलत मिळाली आहे. या योजनेत पुणे प्रादेशिक विभागामध्ये सात लाख 27 हजार 637 शेतकरी सहभागी झालेत. यातील दोन लाख 9 हजार 638 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत.

नागपूर विभागातील तीन लाख 43 हजार शेतकरी सहभागी

या योजनेमध्ये नागपूर प्रादेशिक विभागात तीन लाख 43 हजार 207 शेतकरी सहभागी झालेत. 60 हजार 938 थकबाकीमुक्त झालेत. तर औरंगाबाद प्रादेशिक विभागात सहभागी चार लाख 89 हजार 687 पैकी 17 हजार 29 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहेत. कोकण प्रादेशिक विभागात सहभागी सहा लाख 19 हजार 285 पैकी 1 लाख 9 हजार 594 शेतकरी थकबाकीमुक्त झाले आहे.

Video – Nagpur | ट्रान्झिट रिमांडवर आलेले रवी राणा म्हणतात, आता दुसऱ्या मंत्र्यालाही ईडी अटक करेल, आता कुणाचा नंबर?

Photo | नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, नागपुरात भाजप आक्रमक, अंडरवर्डशी संबंध असल्याचा आरोप

Video – Amravati | मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपचे आंदोलन, महिला पोलीस अधिकाऱ्यांशी शाब्दिक बाचाबाची, भाजप नेते अनिल बोंडेंची जीभ घसरली

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.