Nagpur Crime | गुटखा, सुगंधी तंबाखूची तस्करी, अन्न व औषध प्रशासन विभागाची धाड, 9 लाखांची तंबाखू जप्त
नागपूर पोलिसांनी 9 लाख 77 हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा धाड टाकत जप्त केली. याप्रकरणी दोन आरोपींना पाचपावली पोलिसांनी अटक केली. नागपुरात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची तस्करी होत असल्याचं पुढे आलं.
नागपूर : पाचपावली पोलिसांना (Pachpavli Police) गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, इ रिक्षातून (e Rickshaw) गुटखा आणि सुगंधी तंबाखुची वाहतूक केली जात होती. यावरून पोलिसांनी इ रिक्षा पकडत त्याची तपासणी केली. त्यात तंबाखू आणि गुटखा मिळून आला. मात्र तो कुठून आणला असं विचारताच रिक्षा चालकाने गोडाऊनचा पत्ता सांगितला. पोलिसांनी गोडाऊनवर धाड टाकली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदी असलेला सुगंधी, तंबाखू आणि गुटखा मिळून आला. पोलिसांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाला (Food and Drug Administration Department) याची माहिती दिली. 9 लाख 77 हजार रुपये किमतीचा सुगंधी तंबाखू आणि गुटखा जप्त केला. तर एक इ रिक्षासुद्धा जप्त करण्यात आला. अशी माहिती पाचपावलीचे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली.
दोन आरोपींना अटक
राज्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूवर बंदी असली तरी उपराजधानीत मात्र याची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याचं दिसून येतं. यावर खऱ्या अर्थाने मोठ्या कारवाईची गरज आहे. यशोधरानगर येथील पुष्पराज शंकरराव भानारकर (वय 40 वर्षे). सुगंधी तंबाखू जप्त केली. गुन्हा दाखल. मुद्देमाल लकडगंज येथील रितेश तोष्णीवार यांच्या गोडाउनमधून माल आणला होता. दोन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे.
802 किलो सुगंधी तंबाखू जप्त
जनम, रिमझीम, सागर, विमल, रजनिगंधा, बाबा, पानबहार, पानमसाला, मोरपंख अशा सुगंधी तंबाखू, गुटखा सापडला. ई रिक्षा जप्त केला आहे. 802 किलो सुगंधी तंबाखू कुठून आणला होता, याचा तपास सुरू आहे. या कारवाईत पोलिसांनी अन्न व औषधी विभागालाही सोबत घेतल्याचे पोलिसांनी सांगितलं.