Hanuman Chalisa | नागपुरातील रामनगरात उद्या हनुमान चालिसा पठण, राणा दाम्पत्य-राष्ट्रवादीचे नेते येणार समोरासमोर

नागपुरात हनुमान चालिसा पठणाची काय गरज? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी उपस्थित केलाय. नवनीत राणा यांनी माझ्यासमोर हनुमान चालिसा पठण करून दाखवावं. नाही तर त्या स्टॅंटबाजी करत आहेत असं आम्ही समजू, असं राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार म्हणाले.

Hanuman Chalisa | नागपुरातील रामनगरात उद्या हनुमान चालिसा पठण, राणा दाम्पत्य-राष्ट्रवादीचे नेते येणार समोरासमोर
राणा दाम्पत्य-राष्ट्रवादीचे नेते येणार समोरासमोर
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 5:50 PM

नागपूर : उद्या, शनिवारी राणा दाम्पत्य नागपूरच्या रामनगर येथील हनुमान मंदिरात सामूहिक हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याचवेळी त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा देशातील महागाई दूर व्हावी यासाठी हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळं मंदिरात राणा दाम्पत्य विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगण्याची शक्यता आहे. याच मंदिर परिसरात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शनी देवाची मूर्ती बसवलीय. पूर्वी फडणवीस दर शनिवारी या मंदिरात दर्शनाला यायचे. याच मंदिरात हनुमान चालिसा पठणच्या वेळी राजकीय आखाडा भरण्याची शक्यता मंदिर प्रशासनाला वाटतेय. त्यामुळे मंदिराचा राजकीय आखाडा करू नका, मंदिराचं पावित्र्य भंग करू नका, अशी विनंती या रामनगर (Ramnagar) येथील मंदिर व्यवस्थापनाचे अध्यक्ष रवी वाघमारे ( Ravi Waghmare) यांनी केलीय. सामूहिक हनुमान चालिसा पठण करण्यासाठी रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी पक्षानं लेखी परवानगी घेतली नाही. मात्र तोंडी माहिती दिलीय. शनिवारी मंदिरात हनुमान चालिसा कुणीही म्हणू शकते. मात्र राजकीय हेतूने कुणी म्हणणार असेल तर आमचा आक्षेप आहे. मात्र, हे त्या दिवशी स्पष्ट होईल. त्यामुळं त्या दिवशी आम्ही आमचा आक्षेप नोंदवू, अशी माहिती रामनगर हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे म्हणाले.

मुखपाट हनुमान चालिसा म्हणून दाखवावं

खासदार नवनीत राणा नागपुरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्याच मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेस सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पाठण करणार आहे. देशातील महागाई, बेरोजगारी दूर व्हावी, देशावरील संकट दूर व्हावं यासाठी उद्या हनुमान चालिसा पाठण करणार, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलंय. एकाच वेळेस दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास नवनीत राणा आणि राष्ट्रवादी हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यामुळे खा. नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना उद्या रंगण्याची शक्यता आहे. नवनीत राणा यांनी अमरावतीला हनुमान चालिसा पठण करावं. नागपुरात हनुमान चालिसा पठणाची काय गरज? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार यांनी उपस्थित केलाय. नवनीत राणा यांनी माझ्यासमोर हनुमान चालिसा पठण करून दाखवावं. नाही तर त्या स्टॅंटबाजी करत आहेत असं आम्ही समजू, असं राष्ट्रवादीचे नेते प्रशांत पवार म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, नागपूर ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.