Nagpur Health | थंडीमुळे वातरोग वाढलेत; काळजी कशी घ्यालं, डॉक्टर काय म्हणतात…

डॉ. जीवन लंगडे म्हणाले, दूध, दही, मलाई, रबडीचा आहारात समावेश करावा. कोमट पाणी प्यावे. थंडीत जठराग्नी बलवान झालेला असतो. आहार कमी पडता कामा नये. मधूर, आम्ल, लवण रस प्राशन करावे. जेवण गरम करावे.

Nagpur Health | थंडीमुळे वातरोग वाढलेत; काळजी कशी घ्यालं, डॉक्टर काय म्हणतात...
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 11:17 AM

नागपूर : थंडीमुळं वातरोग वाढीस लागतो. गुडघ्याचे दुखणं वाढते. त्यासाठी आहारातून कडू, तिखट पदार्थ कमी केले पाहिजे. आहार, विहार आणि व्यायाम या त्रिसुत्रीचा वापर केला पाहिजे. गुळापासून तयार झालेले पदार्थ जास्त घेतले पाहिजे. तूप सेवन केले पाहिजे. सकाळी रोजीसारखे गोड पदार्थ सेवन केले पाहिजे. जेवणात लसणाचा वापर जास्त करावा. लसणाची फोडणी द्यावी. तिळाच्या तेलाची मालीश करावी. स्नेहल, स्वेदन करून व्यायाम करावा. शिवाय उष्ण पदार्थ जास्त सेवन करावे. शक्यतो उपवास टाळावा. हळद, अद्रकाचा वापर आहारात वाढवावा, असा सल्ला सक्कदऱ्यातील आयुर्वेदिक हॉस्पिटलमधील (Ayurvedic Hospital in Sakkadarya) योगा व निसर्गोपचार विभागातील (Department of Yoga and Naturopathy) डॉ. जीवन लंगडे यांनी दिलाय. डॉ. लंगडे म्हणाले, दूध, दही, मलाई, रबडीचा आहारात समावेश करावा. कोमट पाणी प्यावे. थंडीत जठराग्नी बलवान झालेला असतो. आहार कमी पडता कामा नये. मधूर, आम्ल, लवण रस प्राशन करावे. जेवण गरम करावे.

स्नेहल, स्वेदन करून व्यायाम करावा

हिवाळा हा ऋतू सर्व ऋतूंमध्ये आरोग्यदायी मानला जातो. आरोग्याची काळजी घेणारे सकाळी वॉकला जातात. त्यामध्ये मध्यमवयीन तसेच ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण जास्त असते. सकाळी थंडी वाढल्यास व्यायामापासून आपण दुरावतो. थंड हवा आरोग्याला पोषक असते. मात्र, धुक्याचे प्रमाण जास्त असते. धुक्यातील प्रदूषण हे दिसत नाही. धुक्यातून वाट काढताना सावधगिरी बाळगली पाहिजे. दमा तसेच श्वसनासंबंधी आजार या काळात जास्त बळावतात. त्यामुळं विशेष काळजी घेण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्‍त केली जाते. थंडीत त्वचा सांभाळणे एक आव्हानच असते. नागपूरकरांसाठी थंडी म्हणजे एक प्रकारची पर्वणी असते. सकाळची हवा बहुतेकांना हवीहवीशी वाटते. यामुळेच नागपूरच्या रस्त्यांवर आरोग्याबाबत जागरूक लोकं सकाळी-सकाळी फिरताना दिसतात. काही जण तर रस्त्यावर धावतात. काही जोराने चालतात. पहाटेची कोवळे ऊन-वारा अंगावर घेण्यासाठी ही सारी धावपळ असते. सकाळी स्नेहल, स्वेदन करून व्यायाम करावा, असेही डॉ. जीवन लंगडे यांनी सांगितलं.

श्वासनलिकेची विशेष काळजी घ्यावी

सकाळीची हवा शंभर रोगांची एकच दवा असं म्हटलं जातं हे उगीचच नव्हे. पण, या कालावधीतील प्रदूषणयुक्त धुके धोकादायक आहे. थंडीत दमा, ब्रॉन्कॉयटीस असे श्वसनासंबंधी आजार वाढतात. योग्य काळजी घेतली नाही, तर दमाग्रस्तांना हृदयविकाराचा, फुप्फुसाचा अटॅक येऊ शकतो. योग्य प्रमाणात ऑक्‍सिजन न मिळाल्याने फुप्फुसांवर आघात होतो. सर्दी, ताप, खोकला, कफ यांचाही त्रास वाढतो, असे डॉक्टर सांगतात. सध्या सर्दी, खोकला, ताप तसेच श्वसन विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. थंड वातावरणामुळे रोग प्रतिकारकशक्‍ती वाढते. त्यामुळे फिटनेससाठी हा काळ उत्तम आहे. मात्र, थंडीत श्‍वासनलिका आकुंचन पावत असल्याने श्‍वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.

Nagpur ZP | नागपूर झेडपी अध्यक्षांचा कार्यकाळ लवकरच संपणार; सोडतीबाबत उत्सुकता शिगेला

VIDEO : पत्नीचा गळा दाबला, सासूची झोपडी जाळली, मेव्हणीच्या लग्नात धिंगाणा, पटोलेंनी सांगितलेल्या गावगुंड मोदीच्या ‘नाना’ करामती!

नागपुरातील न्यूड डान्स प्रकरण, उमरेडच्या ठाणेदाराची बदली; आणखी कुणाकुणावर कारवाईचा बडगा?

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.