Honey Singh | हनी सिंग नागपुरात दाखल; पोलीस ठाण्यात आवाजाची चाचणी देणार?
आज अखेर हनी सिंग नागपुरात दाखल झाला. पाचपावली पोलीस ठाण्यात त्याने हजेरी लावली. तो येणार असल्याची चर्चा खरी ठरली.
नागपूर : रॅप गायक हनी सिंग पोलीस दाखल झाला. नागपूरच्या महाल येथील झोन (Zone at Mahal) तीनमध्ये आपल्या वकिलांसोबत हनी सिंगने हजेरी लावली. आवाजाची चाचणी (Voice test) देण्यासाठी हनी सिंग पोलीस स्टेशनमध्ये अखेर दाखल झाला. कोर्टाच्या निर्देशानुसार हजर राहण्यासाठी त्याला नोटीस देण्यात आली होती. अश्लील गाणी गाऊन यु ट्यूबवर अपलोड केल्या प्रकरणी त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश सत्र न्यायालयाने दिले होते. त्यामुळं हनी सिंगला यावं लागलं. नागपुरातील पाचपावली पोलीस (Pachpavli police) ठाण्यात हजर व्हावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. गेल्या काही दिवसांपासून न्यायालय त्याला हजर राहण्यास सांगत होता. पण, काही ना काही कारण देत तो हे टाळत होता. आज सकाळी हनी सिंग नागपुरात आला का ? याची जोरदार चर्चा सुरू होती. अश्लील नृत्य आणि गीते सादर केल्या प्रकरणी नागपूर त्याला हजर व्हावं लागलं. रात्री हनी सिंग यांचे वकील पोलीस स्टेशनमध्ये पोहचले होते. त्यामुळं हनी सिंग येणार हे जवळपास निश्चित होते.
हनी सिंग वकिलासोबत हजर
27 जानेवारी रोजी न्यायालयाने आवाजाचे नमुने देण्याकरिता 4 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पाचपावली पोलीस ठाण्यात हजर होण्याचा आदेश दिला होता. पण, त्याने सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून या आदेशात बदल करण्याची विनंती केली. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळून लावला. पुन्हा पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्याचा आदेश दिला. त्यामुळे हनी सिंगला हजर व्हावं लागलं.
काय आहे प्रकरण
हनी सिंगने यूट्यूबवर अत्यंत अश्लील गाणे अपलोड केलीत. अशी तक्रार आनंदपाल सिंग गुरमान सिंग जब्बल यांनी 2015 मध्ये दाखल केली. पाचपावली पोलिसांनी इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टच्या कलमान्वये हनीसिंग विरोधात गुन्हा दाखल केला. देश सोडून कुठेही जाऊ नये तसेच पोलिसांना सहकार्य करावे, असा आदेश न्यायालयाने दिला होता. गैरहजर राहण्यासाठी त्याने अर्ज केला होता.