Video : Bridegroom feld from horse | आले घोडाबाच्या मना तिथं कुणाची चालेना, नागपुरात नवरदेवालाच नाचता नाचता पाडले खाली
घोड्याचा मालक त्याला नाचवण्यासाठी प्रयत्न करतो. पण, तो काही कुणाला भाव देत नाही. एक-दोनदा नवरदेवाला गादीवरून हटवितो. पुन्हा नवरदेवाची गादी व्यवस्थित केली जाते. सरतेशेवटी गादीवरून नवरदेवाला धाडकन खाली पाडले जाते. त्यामुळं नवरदेवाची घोड्यावर बसण्याची हौश काही भागत नाही. पुन्हा नको रे बाबा घोडा असं म्हणत नवरदेव गाडीत बसून मंडपात रवाना होतो.
नागपूर : लग्न म्हटलं की बँड, बाजा, बारात. नवरदेव गाडीऐवजी घोड्यावरून मंडपात जात असतो. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यात घडली. नवरदेव घोड्यावर बसला. वरात सोबत होती. सारे नाचू लागले. वऱ्हाडी नाचत होते. बँड वाजत होता. नवरदेवाला घोड्यावर बसविण्यात आले. तोही खुशीनं घोड्यावर बसला. पण, घोडा काही नाचेना. मग घोड्याच्या मालकानं त्याल तालावर आणण्याचा प्रयत्न केला. पण, घोड्याच्या मनात काहीतरी वेगळच सुरू होतं. नवरदेवाची घोड्यावरून वरात निघाली. घोड्यासह नवरदेव पडल्याचा व्हिडीओ व्हायरल (Viral) झाला. व्हिडीओ नेमका कुठला याची खात्री नाही. मात्र नागपूर जिल्ह्यातील सावनेर (Savner) तालुक्यातील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातं. सोशल मीडियावर (Social Media) मात्र या व्हिडीओची धूम आहे.
पाहा व्हिडीओ नवरदेव कसा पडला घोड्यावरून
नागपुरात नवरदेव नाचता नाचता पडला घोड्यावरून खाली. pic.twitter.com/zDWTi6fuOK
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) June 7, 2022
व्हिडीओत नेमकं काय?
या व्हिडीओत नवरदेव घोड्यावर बसला आहे. हौशी फोटो, व्हिडीओ काढत आहेत. घोड्यावर बसल्यावर घोडा काही त्याला रिसपान्स देत नाही. त्यामुळं नवरदेव वारंवार व्यवस्थित बसण्याचा प्रयत्न करतो. पण, घोडा त्याला घसरविण्याचा प्रयत्न करतो. एकदोन वेळा असंच होते. घोड्याचा मालक घोड्याला सरळ करण्याचा प्रयत्न करतो. पण, तो काही केल्या कुणाचं ऐकत नाही. घोडा स्वच्छंदी दिसतो. तो काही केल्या नवरदेवाला भाव देत नाही. शेवटी, अशी एक वेळ येतेचं. घोडा जोरानं झटका देतो. या झटक्यातं नवरदेव घोड्याच्या खाली पडतो. मग, नातेवाईक येतात. नवरदेवाला सावरतात. घोड्याचा मालक घोड्यावर नाराज होतो. नंतर नवरदेव काही घोड्यावर बसत नाही.
घोडा भावच देत नाही
बहुधा नवरदेव बसला की, घोडा नाचायला लागतो. पण, हा घोडा नाचतच नाही. बाजूला नाचगाणं सुरू असतं. वऱ्हाडी बँडच्या तालावर नाचत असतात. पण, घोडा काही केल्या नाचत नाही. घोड्याचा मालक त्याला नाचवण्यासाठी प्रयत्न करतो. पण, तो काही कुणाला भाव देत नाही. एक-दोनदा नवरदेवाला गादीवरून हटवितो. पुन्हा नवरदेवाची गादी व्यवस्थित केली जाते. सरतेशेवटी गादीवरून नवरदेवाला धाडकन खाली पाडले जाते. त्यामुळं नवरदेवाची घोड्यावर बसण्याची हौश काही भागत नाही. पुन्हा नको रे बाबा घोडा असं म्हणत नवरदेव गाडीत बसून मंडपात रवाना होतो.