Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhandara | वैनगंगा नदीचे प्रदूषण कसे रोखणार? उपाययोजनेचा कृती आराखडा लवकरच तयार होणार

वैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्याबाबत उपाययोजना हाती घेण्याचे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय यंत्रणांनी लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचा कृती आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा (Prajakta Lavangare) यांनी दिल्या.

Bhandara | वैनगंगा नदीचे प्रदूषण कसे रोखणार? उपाययोजनेचा कृती आराखडा लवकरच तयार होणार
बैठकीत उपस्थित विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे, जिल्हाधिकारी विमला आर. व इतर. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 23, 2022 | 8:31 AM

नागपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Maharashtra Pollution Control Board) अधिकाऱ्यांनी यावेळी नाग, पिवळी, कन्हान व वैनगंगा नदी प्रदूषणविषयक माहितीचे सादरीकरण केले. नागपूर महापालिका (Nagpur Municipal Corporation), जिल्ह्यातील विविध नगरपालिका, ग्रामपंचायत क्षेत्रातील सांडपाणी नाग, पिवळी व कन्हान नदीत सोडण्यात येते. या नद्यांमधील दूषित पाणी तसेच भंडारा जिल्ह्यातील नगरपालिकेचे सांडपाणीही वैनगंगा नदीमध्ये येते. त्यामुळं वैनगंगा नदीतील पाणी दूषित होत आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व शासकीय यंत्रणांनी नद्यांमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. यासाठीच्या लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचे कृती आराखडे तातडीने सादर करावेत, असे श्रीमती विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा (Prajakta Lavangare) यांनी सांगितले.

सांडपाण्यावरील प्रक्रियेबाबत उपाय

नागपूर जिल्ह्यातील सहा नगरपालिकांचा आढावा घेण्यात आला. लघु व दीर्घकालीन उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू असल्याचे नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातून वैनगंगा नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याबाबतच्या उपाययोजनांविषयीची माहिती जिल्हाधिकारी श्री. कदम यांनी दिली. तसेच नागपूर महापालिका क्षेत्रात सांडपाणी प्रक्रियेची सद्यस्थिती तसेच प्रस्तावित सांडपाणी प्रकल्पांची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी यावेळी दिली.

यांनी बैठकीत केले चिंतन

या बैठकीत नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला, भंडाराचे जिल्हाधिकारी संदीप कदम, नागपूर महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, उपायुक्त (गोसीखुर्द) आशा पठाण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी अशोक करे, उपप्रादेशिक अधिकारी आनंद काटोले यांच्यासह नागपूर आणि भंडारा जिल्ह्यातील नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जलसंपदा विभाग व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Rashmi Thackeray Brother: राष्ट्रपती राजवट लागू करू असं वाटत असेल तर झोपेतून जागं व्हा, आम्ही लढू; राऊतांनी ललकारले

Rashmi Thackeray Brother: ही तर हुकूमशाहीची खतरनाक सुरुवात, पाटणकरांवरील कारवाई म्हणजे ठाकरे कुटुंबावरील हल्लाच; राऊतांचा हल्लाबोल

Wardha Sena Rada : विदर्भात शिवसेनेच्या संपर्क अभियानाच्या नमनालाच पक्षांतर्गत राडा, वर्ध्यात दोन नेत्यांची बाचाबाची कॅमेऱ्यात

'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी
'आलमगीर औरंगजेब..', दादरमध्ये मनसेची बॅनरबाजी.
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं
वारंवार शरीरसुखाची मागणी केली; संतप्त तरुणीने त्याचं काम तमाम केलं.
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं
धक्कादायक! .. म्हणून कर्मचाऱ्याला ऑफिसमध्ये कुत्रा बनवून फिरवलं.
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला
ब्लॅक मंडे! शेअर बाजारात हाहाकार, गुंतवणूकदारांना घाम फुटला.
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?
अस्थापनांमध्ये मराठीच्या मुद्द्यावर मनसेचा यू टर्न का?.
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग
'ऑर्गनायजर'मधल्या 'त्या' लेखाने राजकीय वादंग.
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले
छत्रपती साखर कारखान्याच्या संचालकांना अजित पवारांनी खडेबोल सुनावले.
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला
प्रेमप्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला.
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.