flag hoisting | नागपुरात भिक मागणाऱ्याने फडकविला तिरंगा; झोपडीबाहेरच ध्वजारोहण, कारण काय?

या व्यक्तीकडं राहायला व्यवस्थित घर नाही. पण, देशाभिमान रगारगात साठवलंय. झोपडी दुरुस्त करायला, या देशभक्ताकडं पैसे नाहीत. मात्र, तरीही तिरंगा खरेदी करून त्यांनी तो फडकविला. शिवाय देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर महापुरुषांचे बॅनर्स त्यांनी घरासमोर लावलेत.

flag hoisting | नागपुरात भिक मागणाऱ्याने फडकविला तिरंगा; झोपडीबाहेरच ध्वजारोहण, कारण काय?
खामल्यात झोपडीसमोर फडकविलेले तिरंगा ध्वज
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 12:56 PM

नागपूर : देशभरात 73 व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह आहे. नागपुरातही तो उत्साह पहायला मिळाला. पण एका झोपडीबाहेर मोठ्या अभिमानाने फडकलेला तिरंगा (flag hoisting), सर्वांच्या कुतुहलाचा विषय ठरला. नागपुरातील खामला परिसरात एक आजोबाची झोपडी (Khamla hut) आहे. लोकांना पैसे मागून ते आपलं पोट भरतात. कधी पैसे नाही मिळाले तर उपवास ठरलेला. अशा स्थितीतंही त्यांनी आपल्या झोपडीबाहेर तिरंगा फडकवला. प्रजासत्ताक दिन उत्साहात आणि अभिमानाने साजरा केला. देशाभिमान दाखविण्यासाठी फक्त पैसेच हवेत, असं नाही. सामान्य व्यक्तीसुद्धा अशाप्रकारचा देशाभिमान दाखवू शकतो. तिरंगा ही देशाची शान आणि मान आहे. ती कायम ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यासाठी आपण प्रजासत्ताक दिनी (Republic Day) ध्वजारोहणं केले पाहिजे. देशाचा तिरंगा उंचावला पाहिजे, अशी भावना या देशभक्तानं व्यक्त केली.

बॅनरवर झडकविले थोर पुरुषांचे फोटो

या व्यक्तीकडं राहायला व्यवस्थित घर नाही. पण, देशाभिमान रगारगात साठवलंय. झोपडी दुरुस्त करायला, या देशभक्ताकडं पैसे नाहीत. मात्र, तरीही तिरंगा खरेदी करून त्यांनी तो फडकविला. शिवाय देशासाठी बलिदान देणाऱ्या थोर महापुरुषांचे बॅनर्स त्यांनी घरासमोर लावलेत. यामध्ये देशातील नेत्यांचे तसेच पोलीस अधिकाऱ्यांचे फोटोदेखील आहेत. यातून त्यांच्या मनात असलेला देशाभिमान किती ज्वलंत आहे, याची प्रचिती येते.

पालकमंत्री म्हणतात, शाळा-महाविद्यालये लवकरच सुरू करणार

नागपुरात प्रजासत्ताक दिनाचा सरकारी कार्यक्रम साध्या पद्धतीने कमी लोकांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री नितीन राऊत यांनी ध्वजारोहण करत नागपूरकरांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केलं. यावेळी कार्यक्रम स्थळी सरकारी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे निर्बंध आहेत. त्यामुळं कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम होत आहेत. आमचं सरकार येताच पहिल्याच वर्षी कोविड आला. आम्ही त्या संकटाला तोंड देत आहोत. अनेकांनी आपले नातेवाईक गमावले आहे. आता आपण सावध राहील पाहिजे. या आधी सुद्धा अनेक साथीचे रोग आपल्या देशाने पाहिले आहे. वीज योजनेतून अनेक ग्राहकांना फायदा झाला. नागरिकांनी वीज बिल भरून योजनेचा फायदा घ्यावा कोविडसाठी सरकारने अनेक कामे केली. नागपुरात आता ऑक्सिजनची कमी नाही. आरोग्य यंत्रणेचा आढावा आम्ही नियमित घेत आहोत. आरोग्य यंत्रणा पूर्णतः तयार आहे. नागरिकांची साथ आवश्यक आहे. शाळा-कॉलेज लवकर सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असंही पालकमंत्री नितीन राऊत यांनी यावेळी सांगितलं.

Nagpur Tiger | वाहन अपघातात वाघ जखमी, जंगलात थांबताच दाम्पत्यावर केला हल्ला; उपचाराचे काय?

VIDEO: टिपू सुलतान देश गौरव होऊच शकत नाही, मुंबई महापालिकेच्या वादात फडणवीसांची उडी

कुणाच्या बापाचं ऑफिस नाहीये, मी जाणीवपूर्वक सांगतोय, फडणवीस का संतापले?

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.