Nagpur IPS woman officer : धक्कादायक ! नागपुरात आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, चोरीही, पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे

नागपुरात धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पोलिसांच्या अब्रुचे धिंडवडे काढण्यात आलेत. आयपीएस दर्जाच्या महिला अधिकाऱ्याच्याच घरी चोरी करण्यात आली. घरात घुसून मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस बोलायला तयार नाही. पण, सदर पोलीस हद्दीत गुन्हा दाखल झालाय.

Nagpur IPS woman officer : धक्कादायक ! नागपुरात आयपीएस महिला अधिकाऱ्याच्या घरात घुसून मारहाण, चोरीही, पोलिसांच्या अब्रूचे धिंडवडे
नागपुरात पोलीस अधिकाऱ्याच्या घरी चोरीImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 9:59 AM

नागपुरात एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या शासकीय बंगल्यात चोरी (Theft in Government Bungalow) झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे संबंधित महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. संबंधित तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली आहे. सदर पोलीस (Sadar Police) ठाण्यात शासकीय बंगल्यात चोरी करण्यात आली. तसेच धमकी देऊन मारहाण करण्यात आली. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस यासंदर्भात अधिक माहिती देऊ शकले नाहीत. याबाबत गोपनीयता पाळत असल्याचं दिसून येतंय. ही चोरीची घटना मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घडली. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याच्या (Women Police Officers)ओळखीतल्याच व्यक्तीनं असं केलं असल्याची माहिती आहे. एक लाख रुपये रोख तसेच संपत्तीची काही महत्त्वाची कागदपत्र चोरून नेल्याची माहिती आहे. ही तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस दलात चांगलीच चर्चा रंगली.

चोराला अटक का केली नाही?

संबंधित पोलीस अधिकारी या आयपीएस आहेत. त्यामुळं या घटनेकडं चाणाक्ष नजरेनं पाहिलं जात आहे. नेमक्या या पोलीस अधिकारी कोण आहेत?, त्यांच्याकडून चोरी झाली असताना त्या कुठे गेल्या होत्या का? त्यांना धक्काबुक्की तर केली नाही. मग, स्वतः अधिकारी असताना त्यांना स्वतःचे संरक्षण कसे केले नाही? संबंधित चोराला अटक का केली नाही, असे प्रश्न आता चर्चेले जात आहेत.

एवढी हिंमत कुणाची

एखाद्या आयपीएस अधिकाऱ्याकडं चोरी करण्यासाठी हिंमत लागते. येवढे हे चोर निर्ढावले कसे. त्यांना भीती कशी वाटली नाही. गोपनीयता का पाळली जात आहे. असे नानाविध प्रश्न या निमित्तानं निर्माण झाले आहेत. पण, याची अधिकृत माहिती कुणी दिली नाही. चर्चा आहेत. नागपुरात गुन्हेगारी का वाढतेय. अधिकारी स्वतःचंच संरक्षण करण्यास सक्षम नाहीत का, असे प्रश्न यानिमित्तानं निर्माण होत आहेत.

नेमका गुन्हा काय

आरोपी हा कौटुंबिक मित्र असल्याची माहिती आहे. सदर पोलीस ठाण्यात चोरी करणे, घरात घुसून मारहाण करणे तसेच धोकाधडी करणे यासंदर्भात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Nana Patole: काँग्रेसच्या काही मंत्र्यांचं मंत्रिपद जाणार?, नाना पटोलेंची मंत्रीपदासाठी सेटिंग; मंत्रिमंडळातील फेरबदलाची जोरदार हवा

Maharashtra News Live Update : औरंगाबादेत गर्भपाताच्या किटची बेकायदेशीर विक्री

Video: Urvashi Rautela झाली ‘Oops’ मूमेंटची शिकार! लाइव्ह इव्हेंटमध्ये घडला हा प्रकार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.