AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagpur Crime : शेतकऱ्यांनी दमडीही घेतली नाही तरी 113 कोटींचे कर्ज झालं तरी कसं?

शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घ्यायचे. बँकेत खाते खोलायचे आहेत असे सांगून हे सहकारी एकेक शेतकऱ्यांना सदर येथील कॉर्पोरेशन बँकेत आणत. त्याचे खाते खोलून झाल्यावर शेतकऱ्यांना घरी नेऊन सोडत.

Nagpur Crime : शेतकऱ्यांनी दमडीही घेतली नाही तरी 113 कोटींचे कर्ज झालं तरी कसं?
MAHARASHTRA FARMERS CHIT Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Aug 31, 2023 | 9:13 PM
Share

नागपूर : 31 ऑगस्ट 2023 | शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार, केंद्र सरकारने विविध योजना आणल्या आहेत. तर, शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन त्यांची लुट केली जात आहे. अशीच एक घटना नागपूरमधील मौदा, पारशिवनी आणि रामटेक परिसरातील शेतकऱ्यांबाबत घडली आहे. कर्ज वसुलीसाठी या शेतकऱ्यांना बँकेने पत्र पाठवले. त्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली. आता या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्राची दाखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पोलिस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

2017 मध्ये नागपूर जिल्ह्यात मोठा ओला दुष्काळ पडला. त्यामुळे मौदा, पारशिवनी व रामटेक तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले. याचा फायदा रमण्णाराव मुसलीया बोल्ला याने घेतला. बोल्ला याची मौद इथे राइस मिल आहे. त्याने मिलवर येणाऱ्या शेतकरी, महिला यांना गोड बोलून सरकारची मदत मिळवून देतो, बँकेतून कर्ज मिळवून देतो असे आमिष दाखवले.

मालक बोल्ला याने आपले काही सहकारी सोबत घेतले. हे सहकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड घ्यायचे. बँकेत खाते खोलायचे आहेत असे सांगून हे सहकारी एकेक शेतकऱ्यांना सदर येथील कॉर्पोरेशन बँकेत आणत. त्याचे खाते खोलून झाल्यावर शेतकऱ्यांना घरी नेऊन सोडत. अशाप्रकारे बोल्ला आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एकूण १५१ शेतकऱ्यांची बँकेत खाती खोलली.

रमण्णाराव बोल्ला याने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून त्या शेतकऱ्यांचे धनादेश घेतले. धान्य गहाण ठेवल्याचा मोबदल्यात बँकेकडून कर्ज देण्यात येते असे सांगून त्याने धनादेशावर त्यांच्या सह्या घेतल्या. मात्र ते धनादेश त्याने स्वतःजवळ ठेवले. काही दिवसांनी बोल्ला याने बनावट कागदपत्रांच्या आधारे शेतकऱ्यांच्या नावाने कर्ज घेतले.

रक्कम नाही शिवाय नोटीस, शेतकरी चक्रावले

बँकेच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी न करता कर्ज अर्ज मंजूर केले. कर्जाची रक्कम बोल्ला याने अन्य खात्यात जमा केली. काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना बँकेकडून वसुलीसाठी नोटीस आली. कर्जाची कोणतही रक्कम मिळाली नाहीच शिवाय नोटीस आल्याने शेतकरी चक्रावले. त्यांनी बोल्ला याला गाठून त्याचा जाब विचारला.

शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र

बोल्ला याने तुमच्या कर्जाची रक्कम अन्य कंपनीत गुंतवली आहे. काही दिवसांनी व्याजासह पैसे परत करतो, असे आश्वासन त्याने दिले. मात्र, त्याने शेतकऱ्यांना ना रक्कम दिली ना बँकेत कर्ज जमा केले. अखेर, या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

मुख्यमंत्री शिंदे यांचे पोलिसांना निर्देश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिस महासंचालक यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महासंचालक यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) नेमले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर एसआयटीने बोल्ला आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

18 जणांविरोधात गुन्हा दाखल

विशेष तपास पथकाने रमण्णाराव मुसलिया बोल्ला याच्यासह कॉर्पोरेशन बँकेचे व्यवस्थापक मन्शुराम पाटील (मृत), एनसीएमएलचे तत्कालीन अधिकारी आणि अन्य विविध 12 कंपन्यांचे संचालक यांच्यावर गुन्हा दाखल केला. नागपूर जिल्ह्यातील 151 शेतकऱ्यांची 113 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.