नागपुरातील नर्सिंग होमच्या भंगारात अर्भक! सहा वर्षे जुने असल्याचा दावा, डॉक्टर, भंगारवाला रडारवर

नर्सिंग होमचे डॉक्टर, भंगार व्यावसायिक, कचरा उचलणारे हे सारे आता रडारवर आले आहेत. पुरोहित नर्सिंग होमचे संचालक डॉ. गोकुल पुरोहित, केअर टेकर बिपीन साहू, भंगारवाला सुनील साहू या सर्वांची चौकशी करण्यात आली.

नागपुरातील नर्सिंग होमच्या भंगारात अर्भक! सहा वर्षे जुने असल्याचा दावा, डॉक्टर, भंगारवाला रडारवर
याच ठिकाणी कचरा फेकल्यानंतर अर्भक सापडले.Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 9:24 AM

नागपूर : नागपूरच्या क्वेटा कॉलोनी भागातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सहा अर्भक मिळाल्यानं खळबळ उडाली होती. पोलीस तपासात हे अर्भक जवळच्याच पुरोहित नर्सिंग होमचे (Purohit Nursing Home) असल्याचं पुढं आलंय. हे अर्भक सहा वर्षे जुने आहे. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. यशोदा पुरोहित (Gynecologist Dr. Yashoda Purohit) यांनी एका हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी सहा अर्भक आणले होते. ते अर्भक त्यांनी नर्सिंग होममध्ये सुरक्षित ठेवले होते. मात्र, 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी नर्सिंग होमच्या पुनर्निर्मितीस सुरुवात झाली. त्यामुळं डॉ. गोकुळ पुरोहित यांनी केअरटेकर बिपीन शाहू याला जुने साहित्य विकून टाकण्यास सांगितले. भंगारवाल्याला हे साहित्य विकून टाकण्यात आले. मात्र, भंगारवाल्याने भंगारासह बायोमेडिकल वेस्ट (Biomedical Waste) आणि अर्भक ही घेतले.

उत्तरीय तपासणीनंतर सत्य बाहेर येईल

अर्भक आपल्या कामाचे नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिले. सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झालाय. काचेच्या बरणीत असलेले हे अर्भक नंतर एक कचरा विकणाऱ्या व्यक्तीने काचेची बरणी घेऊन हे अर्भक तसेच टाकून दिले. मात्र, उत्तरीय तपासणीनंतर सत्यता बाहेर येईल, असं मत सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी व्यक्त केलंय.

कोण-कोण रडारवर

न्यायवैद्यक अहवालानंतर अर्भक किती जुने आहेत याचा शोध घेण्यात येईल. अर्भक ठेवण्याची किंवा त्याआधारे तपास करण्याची नर्सिंग होमला परवानगी असते का, याचाही तपास केला जाणार आहे. महापालिका नर्सिंग होमच्या कागदपत्रांची तपासणी करणार आहे. बायोमेडिकल वेस्ट अशाप्रकारे फेकता येत नाही. ज्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले त्यांनाही बोलावण्यात आले होते. नर्सिंग होमचे डॉक्टर, भंगार व्यावसायिक, कचरा उचलणारे हे सारे आता रडारवर आले आहेत. पुरोहित नर्सिंग होमचे संचालक डॉ. गोकुल पुरोहित, केअर टेकर बिपीन साहू, भंगारवाला सुनील साहू या सर्वांची चौकशी करण्यात आली. डॉ. पुरोहित यांच्या पत्नी डॉ. यशोदा पुरोहित या स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. त्या नंदनवनच्या एका होमिओपॅथी कॉलजशी निगडित असल्याची माहिती आहे.

गडचिरोलीत 116 युवक-युवती विवाहबंधनात अडकणार! 16 आत्मसर्मपित नक्षलवाद्यांचा समावेश

परीक्षेचं टेंशन आलंय घाबरू नका! नागपूर विभागातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन नंबर

आदिवासी पाड्यातील विद्यार्थ्यांनी केली विमानतळाची सैर, भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी कदम यांचा पुढाकार

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.