नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

नदीतील पाणी पाहून तिथं खेळायला लागले. नदीत पाणी खोल असल्याची त्यांनी कल्पनाच आली नाही. पाण्यात खेळत असताना दोघेही बुडाले. दोघांचेही कपडे नदीच्या बाजूलाच होते.

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली
हिंगणा तालुक्यातील कृष्णा नदीचा परिसर.
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:27 AM

नागपूर : जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात गणेशपूर (Ganeshpur in Hingana taluka) नावाचं गाव आहे. या गावात रूस्तम खान राहतात. रिजवान (वय अकरा वर्षे) हा त्यांचा भाचा व इमामुल (वय आठ वर्षे) खान हा त्यांचा मुलगा दोघेही इमामुलच्या आईसोबत सरपण गोळा करायला गेले. काही वेळ दोघांनीही मदत करून लागली. सोमवारी दुपारची घटना. संबंधित महिला कृष्णा नदीच्या परिसरात (In the vicinity of the river Krishna) सरपण गोळा करत होती. काही वेळात रिजवान आणि इमामुल हे दोघेही बाजूलाच असलेल्या क्रिष्णा नदीच्या काठावर गेले. नदीतील पाणी पाहून तिथं खेळायला लागले. नदीत पाणी खोल असल्याची त्यांनी कल्पनाच आली नाही. पाण्यात खेळत असताना दोघेही (Both drowned while playing) बुडाली. दोघांचेही कपडे नदीच्या बाजूलाच होते.

मुलांनी सोबत येण्याचा केला होता हट्ट

इकडे इमामुलच्या आईने बालकं दिसत नाही म्हणून शोध घेतला. कृष्णा नदीच्या किनाऱ्यावर त्यांचे कपडे दिसले. त्यावरून ही मुलं नदीत उतरली असावीत, असं तिला वाटलं. तिचा जीव कासावीस झाला. मुलांना येऊ नको, असं तीनं घरीच म्हटलं होतं. पण, मुलांनी हट्ट केला. शिवाय घरी मुलं कुणासोबत वेळ घालवणार हा प्रश्न होताच. दोन्ही मुले लहान होती. त्यांना पोहता येत नव्हते. गंमत म्हणून पाण्यात उरतले असावेत. त्यामुळं त्यांचा मृत्यू झाला. लहान मुलांना सोबत घेऊन जाताना त्यांच्या आईवडिलांना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशाप्रकारच्या घटना होण्यास वेळ लागत नाही.

दोघांचेही मृतदेह बाहेर काढले

पोलीस स्थानकात तक्रार करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा गायकवाड व एमआयडीसीचे ठाणेदार अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने एका मुलाला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर काही वेळाने दुसऱ्या मुलालाही बाहेर काढण्यात आले. यात दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी बोरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

ओबीसी राजकीय आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा दिवस

LIC ची बंद पडलेली पॉलिसी करा पुन्हा सुरु; महामंडळ घेऊन आलंय नवीन योजना

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.