सतत भुंकणाऱ्या शेजारच्या कुत्र्याला गप्प ठेवा! नागपुरात दोन ज्येष्ठ महिलांची उच्च न्यायालयात धाव

नागपुरातील त्रिमूर्तीनगरात दोन वयोवृद्ध बहिणी राहतात. त्या शेजारच्या कुत्र्याच्या भुंकण्यामुळं त्रस्त आहेत. त्या कुत्र्याला गप्प बसविण्यात यावे, यासाठी त्या चक्क कोर्टात गेल्यात.

सतत भुंकणाऱ्या शेजारच्या कुत्र्याला गप्प ठेवा! नागपुरात दोन ज्येष्ठ महिलांची उच्च न्यायालयात धाव
नागपुरात शेजारच्या कुत्र्याचे भुंकणे थांबवावे, यासाठी दोन महिला कोर्टात गेल्यात. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 01, 2022 | 11:11 AM

नागपूर : त्रिमूर्तीनगरात मालती (66) व नलिनी राहगुडे (68) या दोन वयोवृद्ध महिला राहतात. त्या दोघ्याही अविवाहित असल्याची माहिती आहे. शिवाय माईग्रेन आणि अपस्मार या आजारानं त्रस्त आहेत. धीरज डहाके (Dheeraj Dahake) हे त्यांच्या शेजारी राहतात. त्यांच्याकडे जर्मन शेफार्ड (German Shepherd) जातीचा कुत्रा आहे. तो दिवसभर भुंकतो. त्यामुळं आम्हा दोन्ही बहिणींना त्रास होतो, असं त्यांचं म्हणण आहे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला डहाके कुटुंबीयांना अनेकदा विनंती केली. परंतु, त्यांनी यासंदर्भात कुठलाही ठोस उपाययोजना केली नाही. त्यानंतर त्या महापालिकेकडे व पोलिसांकडेही दाद मागण्यासाठी गेल्या. तिथंही त्यांच्या तक्रारीचं निवारण झालं नाही. आम्ही आजारी आहोत. कुत्र्याच्या भुंकण्यामुळं त्रस्त आहोत. त्यामुळं या कुत्र्याचं भुंकणं बंद करा. यासाठी त्यांनी शेवटी उच्च न्यायालयाचा (High Court) दरवाजा ठोठावला. याचिकाकर्त्या महिलांच्या वतीने अॅड. शेख सिबघतुल्ला जागीरदार यांनी कामकाज पाहिले.

डहाके यांनी आरोप फेटाळले

धीरज डहाके यांच्या आई पंचफुला डहाके यांनी यासंदर्भात न्यायालयात उत्तर सादर केले. त्यांनी त्यांच्या उत्तरात याचिकाकर्त्यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. याचिकाकर्त्या महिला या सतत तक्रार करीत मानसिक त्रास देतात. आजपर्यंत आमच्या घरच्या कुत्र्याने कुणालाही दुखापत केलेली नाही. धीरज डहाके यांच्याकडे कुत्रा पाळण्याचा कायदेशीर परवाना आहे. मालकाने पाळीव कुत्र्याला सार्वजनिक ठिकाणी मोकळे सोडले तरच, कायद्यानुसार कारवाई करता येते. त्यामुळं याचिका फेटाळण्यात यावी, अशी विनंती महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे. तर, डहाके यांचा कुत्रा हा पेपरवाला, दूधवाला, भाडेकरू तसेच रस्त्यावरून वाहतूक करणार्‍यांवर भुंकत असतो. भारतीय पशू कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मालकाने कुत्र्याला गप्प ठेवण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

भुंकणे कसे थांबविणार?

मालकाने कुत्र्याला प्रशिक्षण द्यावे. त्याचे भुंकणे थांबवावे अन्यथा महापालिकेने त्याला आपल्या ताब्यात घ्यावे, अशी मागणी या याचिकेद्वारे केली आहे. न्यायालयाने याप्रकरणी मनपा प्रशासन, पोलीस आणि पशू संवर्धन विभाग यांना नोटीस बजावली आहे. कुत्रा असल्याने तो भुंकणारचं. कुत्र्याने सार्वजनिक ठिकाणी घाण केली असेल किंवा कुणाचा चावा घेतला असेल, तर कारवाई करता येईल. पण, कुत्र्याचे भूंकणे कसे थांबविणार, असे उत्तर मनपाने आपल्या शपथपत्रात दिले आहे. त्यामुळं आता हे प्रकरण काय वळण घेतं ते पाहावं लागेल.

नागपूर शहरात आपली बसची चाके थांबली, पगार वाढीच्या मागणीसाठी कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल

फडणवीसांची चौकशी करा, फोन टॅपिंगमागचा मास्टरमाईंड शोधा, काँग्रेसचा पुन्हा सूचक इशारा

राष्ट्रवादीचा दुसरा एक मंत्रीही ‘ईडी’च्या जाळ्यात; नवाब मलिकांनंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का,13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.