Nagpur Crime : नागपुरात 4 वर्षीय मुलीचं अपहरण, खंडणीसाठी केला फोन, दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

मुलीचे वडील चिंताग्रस्त झाले. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नव्हती. नातेवाईकांकडं, आजूबाजूच्यालोकांकडं चौकशी केली. पण, मुलीचा पत्ता लागला नव्हता. तेवढ्यात आकाशानं मुलीच्या वडिलांना फोन केला. मुलगी जीवंत हवी असेल, तर 7 लाख रुपये खंडणी हवी, अशी धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी बोरी पोलिसांना कळविलं.

Nagpur Crime : नागपुरात 4 वर्षीय मुलीचं अपहरण, खंडणीसाठी केला फोन, दोन्ही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
नागपुरात 4 वर्षीय मुलीचं अपहरण
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 5:43 PM

नागपूर : मालकाने नोकरीवरून काढल्याचा राग मनात धरून त्याच्या चार वर्षीय मुलीचे अपहरण केलं. अपहरण केल्यानंतर खंडणीसाठी फोन केला आणि गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अलगद सापडले. ही थरारक घटना नागपूर जिल्ह्यातील हिंगणा (Hingana Police) परिसरात घडली. पोलिसांनी चिमुकलीची सुखरूप सुटका करीत दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशपूर येथील आकाश सोनोने (Akash Sonone) आणि टेंभरी येथील संकेत अनिल ठाकरे अशी या दोन आरोपी युवकांची नावे आहेत. आकाश हा पीडित मुलीच्या कुटुंबाचा ओळखीचा होता. तो तक्रारदार मुलीच्या वडिलांकडे काम करायचा. नंतर त्यांना नोकरीवरून काढले म्हणून आरोपीने हे कृत्य केल्याचं स्पष्ट झालं. अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजय मगर (Superintendent of Police Vijay Magar) यांनी दिली.

नोकरी सुटल्यानंतरही मुलीच्या वडिलांच्या संपर्कात

आकाश सोनोने हा नोकरी पुन्हा मिळावी, या उद्देशाने मुलीच्या वडिलांना भेटायला घरी जायचा.त्यामुळं मुलीची त्याच्याशी ओळख होती. गुरुवारी आकाश मुलीच्या घरी गेला. त्याने मुलीला चॉकटेल खरेदी करून देतो, असा बहाणा सांगितला. तिला खरं वाटलं. त्यामुळं चिमुकली आकाशसोबत गेली. पण, आकाशच्या मनात वेगळंच सुरू होतं. त्यानं चिमुकलीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर आकाशने मुलीच्या वडिलांना खंडणीसाठी फोन केला. त्यांच्याकडं पैसे असल्याची जाणीव आकाशला होती. पैसे मिळावेत, शिवाय मुलीच्या वडिलांचा बदलाही घेता येईल, असा त्याने विचार केला.

7 लाख रुपयांची खंडणी मागितली

इकडं, मुलीचे वडील चिंताग्रस्त झाले. रात्री उशिरापर्यंत मुलगी घरी आली नव्हती. नातेवाईकांकडं, आजूबाजूच्यालोकांकडं चौकशी केली. पण, मुलीचा पत्ता लागला नव्हता. तेवढ्यात आकाशानं मुलीच्या वडिलांना फोन केला. मुलगी जीवंत हवी असेल, तर 7 लाख रुपये खंडणी हवी, अशी धमकी दिली. मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी बोरी पोलिसांना कळविलं. उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांच्या नेतृत्वात तपास करण्यात आला. सीसीटीव्ही तपासण्यात आले. आकाशचे लोकेशन स्ट्रेस करण्यात आले. आकाशसोबत संकेतही होता. पोलिसांनी दोघांच्याही मुसक्या आवळल्या.

हे सुद्धा वाचा

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.