“कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर तात्काळ पायउतार व्हा”; काँग्रेसने सरकारचे अपयश दाखवून दिले…
राज्यातील मुली जर सुरक्षित नसतील तर ही जनता सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्याबाबत सरकारला जनतेला उत्तर द्यावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
नागपूर : कोल्हापूर शहरात सामाजिक शांतता बिघडली असल्याने आता कोल्हापूरसह राजकीय वाचावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळेच शिंदे-फडणवीस सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे.कोल्हापूरमध्ये घटना घडल्यानंतर ज्या दोन मुलांनी औरंगजेबाचा डीपी ठेवला होता, त्या घटनेला मुस्लिम समाजाने विरोध केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईची भूमिकाही मुस्लिम समाजाने घेतली आहे. त्याचबरोबर पोलिसांनीनी कारवाई केली आहे पण तथाकथित काही संघटना महाराष्ट्रात आहेत ज्या सातत्याने असे घटना घडल्यानंतर रस्त्यावर उततात आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असतात असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
नाना पटोले यांनी टीका करताना म्हटले आहे की, राज्याचे गृहमंत्री म्हणतात की, मी खपवून घेणार नाही. मात्र हे कोणाचं खपवून घेणार नाहीत?
सामाजिक परिस्थिती शांततेत हातळण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र असे वातावरण सरकारच निर्माण करत असल्याचा गंभीर आरोपही नाना पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारवर टीका करताना नाना पटोले यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाने या सरकारला नपुसक म्हटले आहे.
तर सरकार जातीय तेढ निर्माण करून फुले, आंबेडकर यांचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.
या सरकारला शांततेत राज्य सांभाळता येत नसेल, कायदा सुव्यवस्था सांभाळता येत नसेल तर तात्काळ या सरकारने पायउतार व्हावे. कारण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे.
त्यामुळे महाराष्ट्र या प्रकारचा थिल्लरपणा खपवून घेणार नाही अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. नाना पटोले यांनी सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका अत्याचार आणि आत्महत्येचा प्रकार जर घडत असेल तर सरकारने हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे असा खोचक सवालही नाना पटोले यांनी केला आहे.
राज्यातील मुली जर सुरक्षित नसतील तर ही जनता सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. त्याबाबत सरकारला जनतेला उत्तर द्यावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थोडीशी जरी लाज असेल तर वसतिगृहातील घटना घडल्याप्रकरणी त्यांनी तातडीने सत्तेतून बाहेर झाले पाहिजे असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला आहे.