Heart Attack : कोर्टात वकील हृदयविकाराच्या झटक्याने खुर्चीतून खाली कोसळला, न्यायाधीशांनी स्वतः नेले रुग्णालयात, पण…

Lawyer Heart Attack : कोर्टाचे कामकाज सुरु होते. वकिलाने युक्तीवाद केला आणि ते जागेवर बसले. अगदी काही क्षणात ते खुर्चीवरुन खाली कोसळले. ही बाब लक्षात येताच न्यायासनावर बसलेले न्यायाधीश आणि इतर कर्मचारी धावले. न्याय‍धीशांनी त्यांच्या कारमधून वकिलाला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेले.

Heart Attack : कोर्टात वकील हृदयविकाराच्या झटक्याने खुर्चीतून खाली कोसळला, न्यायाधीशांनी स्वतः नेले रुग्णालयात, पण...
Follow us
| Updated on: Aug 18, 2024 | 10:49 AM

कोर्टाचे कामकाज सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका आला. ते खुर्चीतून जमिनीवर कोसळले. ही बाब न्याय‍ाधीशांच्या लक्षात येताच, त्यांनी इतरांच्या मदतीने वकिलाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. न्यायाधीशांनी वकिलाला तातडीने उपचार मिळावा म्हणून धावपळ केली, पण त्यांना यश आले नाही. वकीलाची प्राणज्योत मालवली. नागपूर जिल्हा न्यायालयातील या घटनेने एकच हळहळ व्यक्त होत आहे.

नागपूर जिल्हा न्यायालयातील प्रकार

नागपूर जिल्हा कोर्टात एक हृदयद्रावक घटना घडली. ज्येष्ठ वकील इकबाल कुरेशी (64) न्यायालयीन कामकाजासाठी सकाळी 11.30 वाजता जिल्हा न्यायालयात पोहचले. सातव्या मजल्यावरील दिवाणी न्यायालयात त्यांच्या एका प्रकरणावर सुनावणी होणार होती. प्राथमिक सुनावणीत त्यांनी कोर्टाला प्रकरणाची माहिती दिली आणि न्यायनिवाडे सादर केले. त्यानंतर ते खुर्चीत बसले. प्रतिपक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कुरेशी हे खुर्चीतून खाली कोसळले.

हे सुद्धा वाचा

न्याय‍धीश आले धावून

न्याय‍ाधीश एस. बी. पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ते न्यायासनावरुन उठले आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेळ न दवडता कुरेशी यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची धावपळ केली. न्यायालयात स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यांना खूर्चीवर बसवून लागलीच तळमजल्यावर आणण्यात आले.

न्यायाधीश पवार यांनी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे आणि इतर सदस्यांना याची माहिती दिली. कुरेशी यांना स्वतःच्या वाहनातून तताडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण कुरेशी यांना वाचवण्याची शर्थ व्यर्थ ठरली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. कोरोना काळात कुरेशी यांच्या पत्नीचे निधन झाले. दोन मुलींचे लग्न झालेले आहेत. कुरेशी हे एकटेच राहत होते. न्यायालयीन कामकाजानिमित्त ते जिल्हा न्यायालयात आले होते.

आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर जिल्हा न्यायालयात दररोज जवळपास 8,000 वकील काम करतात. न्यायालयीन कर्मचारी वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. तर न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हाभरातून हजारो लोक न्यायालयात येतात. त्यामुळे जिल्हा न्यायालयात एक अँम्बुलन्स आणि प्राथमिक उपचाराची सोय असावी अशी मागणी वकील आणि वकील संघाने केली आहे. प्राथमिक उपचाराची सोय आणि रुग्णालयात तातडीने भरती करता यावे म्हणून एका अँम्बुलन्सची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....