2 दिवसांपूर्वी घरून निघाली, नागपूर रेल्वेस्थानकावर सापडली 17 वर्षीय विद्यार्थिनी! घर सोडण्याचे कारण काय?

ही विद्यार्थिनी रायपूर-सिकंदराबाद रेल्वेने प्रवास करत होती. फोटोतील चेहरा तिच्याशी मिळताजुळता असल्याने तिला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. फलाट क्रमांक आठवर ती उतरली.

2 दिवसांपूर्वी घरून निघाली, नागपूर रेल्वेस्थानकावर सापडली 17 वर्षीय विद्यार्थिनी! घर सोडण्याचे कारण काय?
नागपूर येथील रेल्वेस्थानकावर विद्यार्थिनी सापडली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 03, 2022 | 1:45 PM

नागपूर : बारावीच्या परीक्षा (12th Exam) उद्यापासून सुरू होणार आहेत. लवकरच दहावीच्याही परीक्षा (10th Exam) सुरू होणार आहेत. त्यामुळं दहावी, बारावीचे विद्यार्थी अभ्यासात व्यस्त आहेत. ही बातमी आहे एक 17 वर्षीय विद्यार्थिनीची. ही विद्यार्थिनी रायपूरला राहते. घरी सगळं व्यवस्थित आहे. संपन्न परिवारातील ही विद्यार्थिनी आहे. सर्व सुखसोयी उपलब्ध करून दिल्यानं तिच्याकडून घरच्यांचा अपेक्षा वाढल्या. तुला 90 टक्केच गुण मिळाले पाहिजे, यासाठी घरचे लोकं आग्रही करत होते. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून ती दबावात होती. घरच्यांच्या दबावाला कंटाळून शेवटी तिने घर सोडायचे ठरविले. मंगळवारी नागपूर रेल्वेस्थानकावर (Nagpur Railway Station) ही विद्यार्थिनी दिसली.

रेल्वेने करत होती प्रवास

रेल्वे पोलिसांच्या व्हॉट्सअप गृपवर एक मेसेज आला. त्यात एका विद्यार्थिनीचा शोध घेण्याबाबत माहिती होती. इतवारी रेल्वेस्थानकाचे आरपीएफ यांनी मुलीचा शोध घेतला. ही विद्यार्थिनी रायपूर-सिकंदराबाद रेल्वेने प्रवास करत होती. फोटोतील चेहरा तिच्याशी मिळताजुळता असल्याने तिला नागपूर रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. फलाट क्रमांक आठवर ती उतरली.

नातेवाईकांकडे राहत होती

रेल्वे सुरक्षा दलाच्या माहितीनुसार, तिचे आईवडील छत्तीसगडच्या महासमुंद येथे राहितात. ती विद्यार्थिनी नातेवाईकांकडे रायपूरला शिकत होती. शिवाय त्यांचे काही नातेवाईक नागपूरलाही आहेत. त्यामुळं तिला नागपुरातील नातेवाईकांकडे सोपविण्यात आले. रात्री एकटी प्रवास करत असल्यानं तिला धोका होता. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिला सुरक्षित नातेवाईकांकडे पोहचविले.

Video – संजय राठोडचा राजीनामा घेतलात तर मग मलिकांचा का नाही? फडणवीसांचा ठाकरे सरकारवर तीव्र हल्ला

देवरीच्या गटविकास अधिकाऱ्याने मागितली लाच, कंत्राटदाराने घेतली एसीबीत धाव, काय कारवाई केली?

नागपूर राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे शैक्षणिक संकूल बांधून पूर्ण, मंत्री उदय सामंत यांनी आणखी काय सांगितले?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.