नागपुरात आजपासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरू; पण, कोविड चाचणीचा अहवाल चोवीस तासांतला कसा देणार?

नागपूर शहर आणि ग्रामीण मधील पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिलीय. पण शिक्षकांचा 48 तासातला कोविड चाचणी अहवाल सक्तीचा असल्यानं शाळा सुरू व्हायला एक दिवस विलंब लागणार आहे. काल सायंकाळी उशिरा शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानं पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांच्या चाचण्या करता आल्या नाही. त्यामुळे आदेश येऊनंही आजपासून काही शाळा सुरु झाल्या नाही.

नागपुरात आजपासून पहिली ते बारावीच्या शाळा सुरू; पण, कोविड चाचणीचा अहवाल चोवीस तासांतला कसा देणार?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 9:58 AM

नागपूर : राज्याच्या अनेक भागात शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये (In Nagpur district) देखील शाळा सुरू करण्याबाबत मागणी आहे. मात्र, गेल्या काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने (the district administration) विविध पातळीवर शाळा व पालक यांचे मनोगत जाणून घेतले आहे. टास्क फोर्सकडूनही बाधित संख्या कमी होईल, असे संकेत आहे. या पार्श्वभूमीवर एक फेब्रुवारीपासून शाळा सुरू (School starts from February one) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तथापि, शाळा सुरू करताना सर्व वर्ग स्वच्छ व निर्जंतूककीकरण करण्याविषयी सूचना करण्यात आली आहे. पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत दाखल करून घ्यायचे आहे. शिक्षकांची व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी झाली असणे आवश्यक आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्यास दोन डोस आवश्यक

कोविड प्रतिबंधात्मक उपाय योजना बैठक व्यवस्थेतही करण्याबाबतचे निर्देशित करण्यात आले आहे. याशिवाय परिपाठ, स्नेहसंमेलन व इतर तत्सम कार्यक्रम ज्यामुळे अधिक गर्दी होऊ शकते ते टाळणे बाबतही निर्देशित करण्यात आले आहे. मास्कशिवाय शाळेतील प्रवेश वर्जित करण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी दोन डोस आवश्यक करण्यात आले आहेत.

विद्यार्थी-पालक संभ्रमात

शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांची लिंक तुटली आहे. ऑनलाईन क्लासेस कधी करतात, तर कधी करत नाही. घर पालक प्रत्येकवेळी मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही. शिक्षण म्हणतात, आता मुलं तुमच्याकडं आहेत. तुम्ही लक्ष द्या. पालकांची जबाबदारी वाढली आहे. पण, घरी अभ्यास घेणे किंवा मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, प्रत्येक पालकांना जमतेच असं नाही. परंतु, कोरोड रुग्णांची संख्या अजूनही बरीच आहे. मुलांच्या काळजीपोटी विद्यार्थी आणि पालक दोघेही संभ्रमात आहेत. नागपूर शहर आणि ग्रामीण मधील पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिलीय. पण शिक्षकांचा 48 तासातला कोविड चाचणी अहवाल सक्तीचा असल्यानं शाळा सुरू व्हायला एक दिवस विलंब लागणार आहे. काल सायंकाळी उशिरा शाळा सुरू करण्याचे आदेश आल्यानं पालकांचे संमतीपत्र आणि शिक्षकांच्या चाचण्या करता आल्या नाही. त्यामुळे आदेश येऊनंही आजपासून काही शाळा सुरु झाल्या नाही.

तब्बल सहा महिन्यांनंतर मिळणार विद्यार्थ्यांना पोषण आहार; नागपूर जिल्ह्यातील किती विद्यार्थ्यांना होणार लाभ?

कुत्रं पाळायचंय! या आणि देशी कुत्र्याचं पिल्लू घेऊन जा; प्राणीमित्र संघटनेचा दत्तक देण्याचा उपक्रम

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.