NMC Election | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आखाडा; नागपुरात प्रचारासाठी सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर!
महानगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियातून प्रभावी प्रचारासाठी भाजपने आपली टीम सज्ज केलीय. काँग्रेस नागपुरात आपल्या सोशल मीडिया टीमला दोन दिवसांचं प्रशिक्षण देणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनाही सोशल मीडियावरुन प्रचार करण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक सोशल मीडियातूनही रंगणार आहे.
नागपूर : मुंबई, पुणे, ठाण्यासह 14 महानगरपालिकांमध्ये प्रभाग आरक्षणाची सोडत 31 मे ला काढण्यात येणार आहे. या निवडणुका पावसाळयात आहे. प्रत्यक्ष प्रचारावर मर्यादा येणार आहे. त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिघुल वाजण्याची तयारी सुरु झालीय. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा (Social Media) सर्वाधिक वापर होणार आहे. इच्छूक उमेदवारांची उमेदवारी मिळवण्यासाठी लॅाबिंग असो, की केलेली काम, जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या निवडणुकीत उमेदवार स्वतः आणि विविध राजकीय पक्ष सोशल मीडियाचा सर्वाधिक वापर करणार आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) प्रभाग आरक्षणाची सोडतीच्या तारखा जाहीर होताच, याची सुरुवात झालीय. असा सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे (Ajit Parse) यांचा निष्कर्ष आहे.
राष्ट्रवादी, शिवसेनाही आघाडीवर
आगामी ही निवडणूक शहरी भागात होतेय. शहरी भागातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदार सोशल मीडिया वापरतो. तरुण मतदारांवर सोशल मीडियाचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच आगामी महानगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियातून प्रभावी प्रचारासाठी भाजपने आपली टीम सज्ज केलीय. काँग्रेस नागपुरात आपल्या सोशल मीडिया टीमला दोन दिवसांचं प्रशिक्षण देणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनाही सोशल मीडियावरुन प्रचार करण्यात आघाडीवर आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक सोशल मीडियातूनही रंगणार आहे.
असा होतोय सोशल मीडियातून प्रचार
इच्छूक उमेदवारांनी व्हॅाट्अॅप गृप तयार करून प्रचार सुरु केलाय. उमेदवारी मिळवण्यासाठी सोशल मीडियातून लॉबिंग केली जात आहे. केलेली कामं मतदारांपर्यंत पोहोचविली जातात. प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नकारात्मक बाजू मतदारांपुढे ठेवण्यात येत आहेत. निवडणुकीतील जाहीरनामा मतदारांपर्यंत पोहोचविला जातो. छोट्या बैठका, उद्घाटन, भूमिपूजनाच्या रिल व्हायरल करण्यात येतोय. पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या क्लिपिंग तयार करण्यात येते. ॲानलाईन पोस्टर व्हायरल करण्यात येतात. ॲानलाईन बैठका, प्रचार सभा घेतल्या जातात. विविध पक्षांकडून सोशल मीडिया, मीडिया वॅार रुम तयार करण्यात येतात. आप आपल्या मतदारसंघात नेत्यांची भाषणं व्हायरल करण्यात येतात. अशाच प्रकारे सोशल मीडियाच्या मदतीनं यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे.