Golwalkar Guruji | माधव गोळवलकर गुरुजी जयंती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालाक डॉ. हेडगेवारांनी (Sarsanghchalak Dr. Hedgewar) सिंदी येथे एक विचार शिबिर घेतले. या शिबिराची धुरा माधव गोळवलकर गुरुजींवर (Madhav Golwalkar Guruji) टाकली. तेव्हापासून गुरुजी संघाची धुरा सांभाळू लागले. संघाचा प्रचार-प्रसार केला.

Golwalkar Guruji | माधव गोळवलकर गुरुजी जयंती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजीImage Credit source: गुरुजी (सौजन्य देवेंद्र फडणवीस यांचे ट्विटर अकाउंट)
Follow us
| Updated on: Feb 19, 2022 | 6:55 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव गोळवलकर गुरुजींचा (Madhav Golwalkar Guruji) जन्म नागपूर येथे 19 फेब्रुवारी 1906 रोजी झाला. कोकणातील गोळवल हे त्यांचे मूळ गाव. पण, वडील नोकरीवर असल्याने ते नागपूरला आले होते. गुरुजींची आठ भावंडे दगावली. गुरुजी हे नववे अपत्य. गुरुजी शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर नागपूरच्या हिस्लॉप कॉलेजमध्ये (Hislap College) इंटरपर्यंत शिक्षण घेतले. वैद्यकीय शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी ते लखनौला गेले. पण, तिथं प्रवेश मिळाला नाही. म्हणून त्यांनी वाराणसीतील बनारस हिंदू विद्यापीठातून बी. एस्सी व त्यानंतर एम. एस्सी या पदव्या प्राप्त केल्या. पुढं प्राणीशास्त्रात संशोधन करावे, यासाठी ते मद्रासला गेले. परंतु, हवामान न मानवल्यानं नागपूरला परत आले. बनारस विद्यापीठाने (Banaras University) त्यांना 1933 साली तीन वर्षांसाठी प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पहिले सरसंघचालक डॉ. हेडगेवार हे पंडित मदन मोहन मालवीय यांच्या भेटीसाठी येत असत. त्यावेळी गुरुजींशी भेटीगाठी होत.

राष्ट्रदेवोभव हा मंत्र जपला

विद्यापीठातील तीन वर्षांचा सेवाकाळ संपल्यानंतर गुरुजी सारगाची येथील आश्रमात गेले. 1937 साली मकरसंक्रांतीच्या दिवशी गुरू अखंडानंद यांच्याकडून गुरुजींनी अनुग्रह घेतला. तेव्हा अखंडानंद यांनी गुरुजींना राष्ट्रदेवो भव हा मंत्र जपत तू देशभर फिरशील, असे सांगितले. अखंडानंद यांच्या निधनानंतर गुरुजी अस्वस्थ झाले. डॉ. हेडगेवारांनी गुरुजींमधील कौशल्य हेरले होते. डॉ. हेडगेवारांनी सिंदी येथे एक विचार शिबिर घेतले. या शिबिराची धुरा गुरुजींवर टाकली. तेव्हापासून गुरुजी संघाची धुरा सांभाळू लागले. संघाचा प्रचार-प्रसार केला. 1941 मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या मृत्यूनंतर दुसरे सरसंघचालाक म्हणून गुरुजींना संघाचे सारथ्य केले.

सेवा संस्थांमागे गुरुजींची प्रेरणा

विश्व हिंदू परिषद, विवेकानंद शिला स्मारक, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, वनवासी कल्याण आश्रम, शिशू मंदिर अशा सेवा संस्थांमागे गुरुजींची प्रेरणा होती. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बरेच आरोप झाले. संघाची प्रतिमा खराब करण्याचे बरेच प्रयत्न झाले. पण, गुरुजींच्या नेतृत्वातील संघाने कधी गुडघे टेकले नाही. दरम्यान, गुरुजींना कारावासही झाला. देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न झाला. पण, या सर्वांमधून गुरुजी सहीसलामत बाहेर पडले. संघाचे कार्य राष्ट्रकार्य म्हणून त्यांनी सुरूच ठेवले. शेवटच्या दिवसांत गुरुजींना कँसर झाला. पाच जून 1973 रोजी गुरुजींनी देहत्याग केला. ते आज आपल्यात नाहीत. पण, त्यांचे विचार निरंतर आपल्यासोबत राहतील. आपल्याला प्रेरणा देत राहतील.

सोलापुरात गुलाल उधळत शिवजन्मोत्सव, परवानगी शिवाय हजारोंच्या संख्येने युवकांची उपस्थिती; महाराजांच्या मुर्तीचं वाटप

Summer Soybean: महाबीजच्या जनजागृतीने सोयाबीन क्षेत्र वाढले आता शेतकऱ्यांची परीक्षा..!

Phulera Dooj 2022 | प्रेमविवाहाची इच्छा आहे,पण यश मिळत नाही तर फुलेरा दूजच्या दिवशी हे उपाय करा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.