Nagpur Pollution | महाजनकोच्या प्रदूषणाची नितीन गडकरींकडून दखल; व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले पत्र

लीना बुद्धे यांच्या सादर केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालाची दखल गडकरी यांनी घेतली. सीएफएसडी आणि असर यांनी अभ्यासानंतर तयार केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालानंतर गडकरींनी संबंधितांना पत्र लिहिलंय.

Nagpur Pollution | महाजनकोच्या प्रदूषणाची नितीन गडकरींकडून दखल; व्यवस्थापकीय संचालकांना लिहिले पत्र
कोराडी परिसरातील प्रदूषित भाग
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 2:43 PM

नागपूर : महाजनकोकडून होणाऱ्या प्रदूषणाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून (Nitin Gadkari) दखल घेण्यात आली. नितीन गडकरी यांनी महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) संजय खंदारे यांना यासंदर्भात पत्र लिहिले. कोराडी, खापरखेडा वीज प्रकल्पातील फ्लाय अ‍ॅश प्रक्रियेत पर्यावरणीय नियमांची पूर्तता केली गेली नाही. याबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे गडकरी यांनी निर्देश दिलेत. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या (Center for Sustainable Development) लीना बुद्धे यांच्या सादर केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालाची दखल गडकरी यांनी घेतली. सीएफएसडी आणि असर यांनी अभ्यासानंतर तयार केलेल्या पाणी प्रदूषणाच्या अहवालानंतर गडकरींनी संबंधितांना पत्र लिहिलंय.

जमीन राखेमुळं प्रदूषित

कोराडी आणि खापरखेडा वीज केंद्रामुळं या भागात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय. या प्रदूषणाचा काय परिणाम झाला, याचा अभ्यास सीएफएसी आणि असर या सामाजिक संस्थांनी केला होता. तेव्हा धक्कादायक निष्कर्ष समोर आलेत. या परिसरातील पाणी दूषित झालंय. जनावरसुद्धा असं दूषित पाणी पिण्यास मागेपुढं पाहतात. जमिनीची सुपिकता नष्ट झाली. आधी पिके व्हायची. आता जमीन राखेमुळं प्रदूषित झाली. त्यामुळे पिके काढणे शक्य नाही. जी झाडे लावली जातात, ती राखेखाली दडपली जातात. त्या झाडांची वाढ होत नाही.

हवा, पाणीही दूषित

दूषित घटक हवेत मिसळल्यानं हवेचा दर्जा घसरला. हवेत कार्बनडाय ऑक्साईडचं प्रमाण वाढलं. श्वास घेण्यास त्रात होत आहे. नागरिकांना श्वसनाशी संबंधित आजार झाले आहेत. विहिरींमधील पाणी दूषित झालंय. ते पिण्यायोग्य राहीलं नाही. या साऱ्या समस्या निर्माण झाल्यामुळं सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. या संदर्भात आज पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही बैठक बोलाविली होती. प्रदूषित गावांचं करायचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ उपाय शोधून काढणार आहे. त्यानंतर प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

Nagpur Pollution | नांदगाव येथील राखेचे प्रदूषण कमी होणार काय?; आदित्य ठाकरेंनी बोलावली बैठक, टि्वटवरून दिली माहिती

नागपुरात दोघांना जलसमाधी; सरपण गोळा करायला गेली नि कृष्णा नदीत दोन बालकं बुडाली

Nagpur | शेतकऱ्यांनो, तुम्हाला माहीत आहे काय?; पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणतात, शेळ्या-मेंढ्यांपासून कोंबड्यांचाही काढता येतो विमा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.