Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात प्रथमच पुण्यात ॲल्युमिनिअमचे मेट्रो कोचेस धावणार, मेक इन इंडियाचे स्वप्न साकार

पुण्यात (Pune) 'मेक इन इंडिया' (Make in India) अंतर्गत देशातील पहिल्या अ‌ॅल्युमिनिअम (Aluminium) बॉडीची मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो मेसर्स तितागड वॅगन कंपनी तयार करणार आहे.

देशात प्रथमच पुण्यात ॲल्युमिनिअमचे मेट्रो कोचेस धावणार, मेक इन इंडियाचे स्वप्न साकार
MetroImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 8:18 AM

नागपूर : पुण्यात (Pune) ‘मेक इन इंडिया’ (Make in India) अंतर्गत देशातील पहिल्या अ‌ॅल्युमिनिअम (Aluminium) बॉडीची मेट्रो धावणार आहे. ही मेट्रो मेसर्स तितागड वॅगन कंपनी तयार करत आहे. मेट्रोचे कोचेस संपूर्णपणे अ‌ॅल्युमिनियम धातूपासून निर्माण करण्यात येणार आहेत. कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अ‌ॅल्युमिनियमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 102 कोचेसच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आलं आङे. करारातंर्गत पश्चिम बंगालच्या कारखान्यात निर्मित तीन ट्रेन इटलीला पाठविणार असून भारतातील वातावरण आणि प्रवाशांच्या गरजेनूसार तयार केलेल्या उर्वरित 31 ट्रेन पुण्यात पाठविण्यात येणार आहेत.

पहिल्या अ‌ॅल्युमिनिअम बॉडीची मेट्रो पुण्यात धावणार

पुण्यात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत देशातील पहिल्या अ‌ॅल्युमिनिअम बॉडीची मेट्रो धावणार आहे. पुणे मेट्रोला यासाठी 31 ट्रेन पाठवण्यात येणार आहेत. ही मेट्रो मेसर्स तितागड वॅगन कंपनी तयार करणार असून ती संपूर्ण अ‌ॅल्युमिनिअम धातूपासून निर्माण करण्यात येणार आहे.

कोलकात्याच्या कंपनीकडून निर्मिती

कोलकाता स्थित तितागड वॅगन कंपनीने पुण्याच्या महामेट्रोसाठी अ‌ॅल्युमिनिअमच्या कोचचे लाँचिंग केलं आहे. तितागड वॅगन कंपनीला डिझाईन, उत्पादन, पुरवठा अशा अटींवर पुणे मेट्रो प्रकल्पासाठी 102 कोचेसच्या निर्मितीचे कंत्राट देण्यात आलेलं आहे.

अ‌ॅल्युमिनिअम कोच इटलीला देखील जाणार

करारातंर्गत पश्चिम बंगालच्या कारखान्यात निर्मित तीन ट्रेन इटलीला पाठविणार असून भारतातील वातावरण आणि प्रवाशांच्या गरजेनूसार तयार केलेल्या उर्वरित 31 ट्रेन पुण्यात पाठविण्यात येणार आहेत.

मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये मेट्रो सेस लागणार

राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र येत्या 1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात 1 एप्रिल 2020 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेट्रो अधिभारावर सवलत देण्यात आली होती. ही मुदत 31 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून मेट्रो अधिभार आकारला जाणार आहे.

इतर बातम्या:

Electric Shock | इलेक्ट्रिक पोलवर विजेचा धक्का, रत्नागिरीत वायरमनचा जागीच मृत्यू, विजेच्या खांबावर भयावह दृश्य

Akshaye Khanna Birthday : हिमालयपुत्र ते संजय बारू… जाणून घ्या अक्षय खन्नाच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरलेल्या भूमिका…

'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.