मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या नागपूर दौऱ्यावर
राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे पदाधिकऱ्यांचा पदनियुक्ती सोहळा
तीन महिन्यांत राज ठाकरे दुसऱ्यादा नागपूरच्या दौऱ्यावर
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा शुक्रवारचा दौरा महत्त्वाचा
नवी दिल्ली : संसदीय पक्षाच्या कर्मचाऱ्याच्या खात्यावर राहुल शेवाळे यांनी ऑब्जेक्शन घेतल्यानं थकले पगार,
शिवसेनेच्या खासदारांचं कार्यालयीन खाते आहे, त्यावरुन कर्मचाऱ्यांचे वेतन होत असते.
पगार काढण्यासाठी विनायक राऊत आणि अनिल देसाई यांची सही आवश्यक असते,
शेवाळे यांनी खात्यावर ऑब्जेक्शन घेतल्यानं खात्याला स्टे आहे, तो स्टे काढून टाका,
ठाकरे आणि शिंदे गटाच्या खासदारांच्या एकत्रित बैठकीत झालेल्या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा विषय चर्चेला गेला.
नागपूर : बबनराव पाचपुते रुग्णालयात दाखल
भाजपचे ज्येष्ठ नेते बबनराव पाचपुते यांची प्रकृती बिघडली
नागपुरातील विवेका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने ते नागपुरात आले होते
सकाळी अस्थमाचा त्रास असल्याचे विधिमंडळात परिसरातील उपचार केंद्रात गेले
बबनराव पाचपुते यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते
पुणे : दिशा सालियनची केस जरी एस आयटीकडे दिली तरी हाती काही लागणार नाही,
पाण उतारा करून घेतील, रुपाली पाटलांची देवेंद्र फडणवीसांवर टिका,
एकट्या आदित्यच्या विरोधासाठी शिंदे फडणवीसांनी खोटी फौज उभी केली, आदित्य ठाकरे याला घाबरणार नाहीत,
दिशा सालियनचं कुटुंब म्हततंय आमची मुलीची बदनामी करू नका, एकदा झालेल्या चौकशीची पुन्हा चौकशी करता येत नाही,
तुम्हाला कारवाई करायची असेल तर कोर्टात जा, रुपाली पाटलांचा सत्ताधाऱ्यांना सवाल.
नवी मुंबई : नवी मुंबई शुभारंभासाठी मेट्रोला मुहूर्त मिळेना ?
नवी मुंबई मेट्रो सेवा सुरूबाबतच्या सिडकोकडून सर्व चाचण्या झाल्या आहेत.
मेट्रो सेवा शुभारंभासाठी तारीख पे तारीख चर्चा सुरू आहे.
सिडकोने बेलापूर ते पेंधर या 11 किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम 2011 सुरू केले आहे.
2018 साली सुरू होणारी मेट्रो सेवा सुरू होत नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये नाराजी.
संध्याकाळी 4 वाजता महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद
नागपूर अधिवेशना दरम्यान झालेल्या गोंधळावर राऊत काय बोलणार ?
दिशा सालीयान प्रकरण गाजत असतानाच संजय राऊत यांची पत्रकार परिषद
तेरणा साखर कारखाना भैरवनाथ साखर उद्योग समूहाला भाडेतत्वावर देण्याचे DRAT कोर्टाचे आदेश
जिल्हा बँकेनी टेंडर प्रक्रिया राबवलेली योग्य असल्याचे दिले आदेश
माजी मंत्री अमित देशमुख यांच्या 21 शुगर उद्योग समूहाची याचिका फेटाळली
भैरवनाथ समूहाला 25 वर्षासाठी तेरणा कारखाना भाडेतत्वावर देण्यात येणार
नोव्हेंबर 2021 मध्ये तेरणा कारखान्याने कारवाई झाली होती मात्र माजी मंत्री अमित देशमुख यांच्या समूहाने केली होती कोर्टात याचिका
रत्नागिरी : माजी खासदार निलेश राणे यांची एनएचआय अधिकाऱ्यांची फोन वरून चर्चा,
कोकणी माणसाशी संघर्ष करू नका, नीलेश राणे यांचा इशारा,
आम्ही सहकार्य करतोय, आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका,
तुमच्याकडे अधिकाऱ्यांकडे कुठलीच अधिकृत पत्र नाही,
जोपर्यंत टोल बंद होत नाही तोपर्यंत आम्ही इथे येणार,
आम्हाला हलक्यात घेऊ नका, एनएचआय अधिकाऱ्यांना निलेश राणे यांचा इशारा.
संतोष बांगर मटका आणि पत्त्यांचे क्लब चालवून दिवसाला एक लाखाचा हप्ता घेणारा माणूस
संतोष बांगर यांच्यावर अनेक खुनाचे गुन्हे दाखल आहेत
संतोष बांगर ला आम्ही सरळ करू
राहुल शेवाळे याचे अनेक लफडे आहेत, हा एका महिलेला घेऊन परदेशात गेला होता
त्यावेळी याची बायको उध्दव साहेबांकडे रडत आली होती ती भानगड उध्दव साहेबांनी मिटवली
अमृता फडणवीसांच्या विरोधात काँग्रेसची महिला आघाडी आक्रमक
भारताचे दोन राष्ट्रपिता आहेत हे वक्तव्य अमृता फडणवीसांनी केलं होतं
राज्यातील सगळ्या जिल्ह्यात आणि तालुक्यात आंदोलन होणार
उद्या नागपुरात महिला आघाडी करणार अमृता फडणवीसांविरोधात आंदोलन
वरिष्ठ स्तरावरून महिला पदाधिकाऱ्यांना आदेश!
दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, राज्यपाल हटावची घोषणाबाजी
विरोधकांची राज्यपाल आणि राज्य सरकारविरोधात विधानभवनासमोर जोरदार घोषणाबाजी
राज्यपाल हटवा, महाराष्ट्र वाचवाचा बॅनर फडकवला
आदित्य ठाकरे, रोहित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अजय चौधरी, सचिन अहिर यांची घोषणाबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज दुपारी उच्चस्तरीय बैठक
बैठकीत कोविड 19 शी संबंधित परिस्थितीचा घेणार आढावा
चीनसह अन्य देशांमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने भारताची आरोग्य यंत्रणा सतर्क
अविश्वास ठराव मांडण्यासाठी 26 डिसेंबर रोजी विशेष सभेचे आयोजन
अविश्वास ठरावाच्या बाजूने असणारे 12 सदस्य भ्रमंतीवर गेले असून ते सोमवारी सकाळीच परत येणार
विनाकारण शासकीय कामात ढवळाढवळ करणे, न.पं. सदस्यांना विश्वासात न घेता मनमर्जीने कोणतेही काम करणे इत्यादी कारणावरून हा अविश्वास ठराव आणण्यात आलाय
उर्फी जावेदला बलात्काराच्या, जीवे मारण्याच्या धमक्या देणाऱ्याला अटक
नवीन गिरी नावाच्या व्यक्तीला गोरेगाव पोलिसांनी केली अटक
उर्फीला व्हॉट्स ॲपद्वारे दिली होती बलात्काराची आणि जीवे मारण्याची धमकी
तीन दिवसांत 30 आमदारांनी विधानभवन परिसरात केली आरोग्याची तपासणी
30 पैकी निम्म्या आमदारांना सर्दी खोकला आणि काहींना ताप
काही आमदारांना मधुमेह, उच्चरक्तदाब
नागपुरातील थंडीमुळे आमदारांना सर्दी, खोकला
आतापर्यंत तीन दिवसांत विधानभवन परिसरात एकूण 611 जणांची आरोग्य तपासणी
611 जणांपैकी 30 आमदारांनी केली तपासणी
अजित वसंतराव पाटील असे या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्याचे नाव
स्थानिक नागरिकांनी कारखान्याविरुद्ध केलेल्या तक्रारीवर कारवाई न करण्याकरिता तसेच परवाना देण्यासाठी 2 लाख रुपयांची लाच मागितली होती.
काल रात्री 2 लाखाची लाच स्वीकारताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने अटक केली.
घनसावंगी मतदार संघात भाजप राजेश टोपेना धक्का देण्याच्या तयारीत
उद्योजक सतीश घाडगे यांचा भाजप मध्ये करून घेतला प्रवेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून घेतला प्रवेश
घनसावंगी मतदार संघातून सतीश घाडगे मैदानात उतरण्याची शक्यता
राजेश टोपे यांचा 25 वर्षांपासूनचा मतदार संघ पाडण्याची भाजपची रणनीती
सतीश घाडगे हे घनसावंगी मतदार संघातील साखर उद्योजक
खाजगी साखर कारखाण्यामुळे सतीश घाडगे यांचा घनसावंगी मतदार संघात दांडगा जनसंपर्क
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील वाकड पोलीस ठाण्याचा कारभार रामभरोसे,
तपास पथकच नसल्याने गुन्हेगार मोकाट,अनेक गंभीर गुन्ह्यातील तपासही थंडावले,
अवैध धंद्याना अभय दिल्याचा ठपका ठेवत तत्कालीन आयुक्त अंकुश शिंदे यांनी 2 अधिकारी आणि 13 कर्मचारी यांना वाहतूक शाखेत संलग्न करण्यात आले आहे,
सर्वाधिक गुन्हेगारी टोळ्या वाकड परिसरात असल्याने शहरातील सर्वात हॉट पोलीस ठाणे समजले जाते,
नवनियुक्त पोलीस आयुक्त विनोय कुमार चौबे काय निर्णय घेतला ह्याकडे सर्वांचे लक्ष.
पुणे : पुण्यात गोवरनं महापालिकेची चिंता वाढवली,
नव्याने 15 जणांचा गोवरचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह,
15 जणांना लागण तर शहरात रुबेलाचेही दोन रुग्ण आले आढळून,
कोथरूड आणि खराडीतील 12 आणि 11 वर्षीय मुलाचा समावेश आहे,
तर एका महिलेलाही गोवरची लागण झाली आहे,
आतापर्यंत पुण्यात 27 गोवरचे रुग्णाची नोंद झाली आहे.
महापालिका अलर्ट मोडवर गोवरचं सर्वैक्षण आणि लसीकरण करतीये.
पुणे : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 11 गावांत आता टीडीआर वापरता येणार,
नगरविकास विभागानं काढले आदेश,
11 गावांचा (डीपी )आराखडा तयार होत नसल्याने टीडीआर वापरता येत नव्हता,
मात्र आता नगरविकास विभागानं याला परवानगी दिली आहे.
राखीव जागा आता टीडीआरच्या माध्यमातून संपादिय करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर जयसिंगपूरसह गडहिंग्लज बाजार समितीची निवडणूक लांबणीवर
बाजार समिती निवडणूक प्रक्रियेला 3 जानेवारीपर्यंत स्थगिती, नागपूर खंडपीठाचा निर्णय
ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्यांची नावं बाजार समित्यांच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी याचिका
बाजार समित्यांसाठी 29 जानेवारीला होणार होतं मतदान
तर येत्या शुक्रवारपासून सुरू होणार होती अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया
पोलीस पाटलांच्या संघटनेसह विविध संघटनांचे आज मोर्चे धडकणार
सर्व मोर्चे झिरो मैल येथे सर्व मोर्चे अडवले जाणार
मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
भाजपने कोट्यवधीचे कंत्राट कंत्राटदाराला दिले आहे
तिरंगी ध्वजाने इमारती पुसल्या गेल्या आहेत
कंत्राटदाराला 100 कोटी गेले कुठे?
ठाकरे गटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक धक्का
आज सकाळी चौधरी यांचा शिंदे गटात प्रवेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश