Maharashtra Winter Session 2022 Live : कर्नाटक व शिंदे सरकारच्या विरोधात आघाडीचे आमदार आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी
Maharashtra Winter Session 2022 Live Updates : जयंत पाटील यांच्या निलंबनाचे पडसाद उमटणार? राष्ट्रवादीसह विरोधक सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार?
मुंबई: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध प्रश्नांवर विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार चर्चा घडत आहे. आजही अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत. कोणत्या मुद्द्यावर विरोधक आज सत्ताधाऱ्यांना घेरतात आणि सत्ताधारी त्यांना कसे उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.
LIVE NEWS & UPDATES
-
नागपुरात काँग्रेसतर्फे आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणि नागपूर महिला काँग्रेसकडून महागाई विरोधात आंदोलन
नागपूरच्या व्हेरायटी चौकात महागाई आणि राष्ट्रपिता याचा अपमान झाल्याचा आरोप करत आंदोलन
अमृता फडणवीस यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात वक्तव्य केल्याच्या निषेर्धात आंदोलन
महागाई, पेट्रोल, डिझेल आणि सिलेंडरच्या वाढत्या दराच्या निषेध नोंदविला
केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देत आंदोलन करण्यात आले
महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
-
विधानभवनाच्या गेटसमोर महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न
कविता चव्हाण नावाच्या महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला
आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास गेट नंबर दोन समोरील घटना
नागपुरात तिने केरोसीनसारखा पदार्थ अंगावर ओतून घेतला
नागपूर पोलिसांनी प्रतिबंध करून महिलेला घेतलं ताब्यात
ही महिला सोलापूरची असून पोलीस चौकशी करत आहेत
-
-
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील बंगळुरूला रवाना
रुटीन चेकअपसाठी शहाजीबापू बंगळुरूला गेले आहेत
पुणे विमानतळावरून ते बंगळुरूला गेले
-
नाशिकच्या पुष्पाचं पोलिसांना पुन्हा आवाहन
नाशिक : अतिशय सुरक्षित असा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या बंगल्यातून चंदनाचे झाडांची चोरी.
काही महिन्यांपूर्वी देखील याच बंगल्यातून चंदनाच्या झाडाची चोरी झाल्याचे आले होते समोर.
बंगल्याच्या आत प्रवेश करून चंदनाच्या झाडाच खोड चोरांनी केल लंपास..
महसूल आयुक्तांच्या बंगल्याच्या समोर हाकेच्या अंतरावरच आहे मुंबई नाका पोलीस चौकी
पोलीस सुरक्षा असताना देखील पुन्हा चंदनाच्या झाडाचे खोड चोरून नेल्याने येथील सुरक्षेबाबत निर्माण होत आहे अनेक प्रश्न
या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
-
कर्नाटक व शिंदे सरकारच्या विरोधात आघाडीचे आमदार आक्रमक, विधानभवनाच्या पायर्यांवर जोरदार घोषणाबाजी
काळ्या पट्टया बांधून आमदारांनी केला राज्य सरकारचा निषेध
बेळगाव कारवार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे… बेळगाव कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… सरकार हमको दबाती कर्नाटक को घबराती है…
कुंभकर्णाने घेतलं झोपचं सोंग, तिकडे कर्नाटक सरकार मारतंय बोंब… कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध… लोकशाहीचा खून करणार्या सरकारचा धिक्कार असो…
कर्नाटक सरकार मुजोरी करतंय, महाराष्ट्र सरकार कुंभकर्णासारखं घोरतंय…सीमा प्रश्नी भूमिका घ्या नाहीतर खुर्च्या खाली करा… भूखंडाचा श्रीखंड खाणार्या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो…
काळ्या पट्टया बांधून महाविकास आघाडीच्या आमदारांच्या सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी
-
-
अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर जिवंत तारली मच्छिचा खच
विरार : जिवंत तारली मच्छिचा खच गुरुवारी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर लागला होता
आख्या समुद्र किनार्यावर फडाफड उडताना समुद्रात सर्वत्र तारली मच्छि दिसत होती. काही जिवंत होत्या तर काही मृत अवस्थेत आढळून आल्या आहेत
अचानक समुद्र किनार्यावर माशा उडताना पाहून मच्छिमार ची एकाच धावपळ उडाली असून, कोणी जाळी घेऊन तर कोणी टोपले घेऊन, तर कोणी हाताने माशा पकडण्यासाठी धावत होते.
माशांच्या फडफड उडण्याने समुद्र किनार्यावर एक आगळावेगळा नजारा ही पाहायला मिळाला आहे
पण या माशा अचानक समुद्र किनार्यावर कशा आल्या असाव्यात की कोणी समुद्रात केमिकल किंवा ऑइल टाकल्याने जीव वाचविण्यासाठी समुद्र किनार्यावर लागल्या असाव्यात असा अंदाज वर्तविला जात आहे.
-
आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही मोहित कंबोज यांची सुटका
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाखेकडून क्लीन चीट,
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते,
संजय पांडे आणि मोहित कंबोज यांच्यातील वाद जोरदार चर्चेत, यानंतर संजय पांडे यांनाच झाली होती अटक,
मोहित कंबोज यांनी थेट पांडे यांना आव्हान देत पांडे यांचेच आर्थिक घोटाळे बाहेर काढले होते,
कथित बॅंक घोटाळा प्रकरणात मोहित कंबोज यांना EOW करून पुर्णपणे क्लीन चीट,
आर्म्स ॲक्ट अंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यांमधूनही कंबोज यांची सुटका,
मुंबई पोलिसांकडून या दोन्ही प्रकरणात कंबोज यांना क्लिन चीट.
-
नाशिक – त्र्यंबकेश्वर देवस्थान मध्ये मास्क सक्तीचा निर्णय
उद्यापासून मंदिरात येणाऱ्या भाविकांनी मास्क परिधान करण्याचे आदेश
त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या अध्यक्षांच्या निर्णयानंतर उद्यापासून अंमलबजावणी
कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
-
सांगली- संजय दादा गेळे आणि अश्विनी संजय गेळे यांच्या विरुद्ध जादुटोणा भोंदुगिरी केली म्हणून गुन्हा दाखल
आटपाडीतील खासगी रुग्णालयातच रुग्णावर तंत्रमंत्र, जादूटोण्याने उपचाराचा प्रयत्न
आटपाडी पोलिसांनी जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा केला दाखल
-
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा चोरीवर आता सीसीटीव्हीची नजर
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा चोरीवर आता सीसीटीव्हीची नजर,
मार्केट यार्ड मधील कांदा चोरीमुळे शेतकरी आणि व्यापारी हैराण झाले होते,
कांदा चोरीच्या घटनेमुळे मार्केट यार्ड आतील कांदा लिलाव एक दिवस बंदही ठेवण्यात आले होते,
त्यानंतर आता बाजार समिती प्रशासनाने संपूर्ण मार्केट यडात महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतलाय,
यापूर्वी 100 पैकी 90 कॅमेरे बंद स्थितीत असल्याने कांदा चोरीच्या घटना वाढल्या होत्या,
येत्या आठवडाभरात हे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
-
अखेर जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर
नाशिकसह जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होणार
नाशिक वगळता जिल्ह्यातील तेरा बाजार समितींचे आजपासून सुरू होणार होते नामांकन
20 डिसेंबर रोजी निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचे मतदारांमध्ये नावे नसल्याने याचिका झाली होती दाखल
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने दिले स्थागितीचे आदेश
-
नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नो मास्क नो एन्ट्री
सप्तशृंगी गड : आता नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नो मास्क नो एन्ट्री,
आता सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी मास सक्ती, सप्तशृंगी देवस्थानने घेतला निर्णय,
सुरक्षित अंतर ठेऊनच दर्शन घ्यावे असे देवस्थानच्या वतीने आवाहन,
देशभरातील कोविडची वाढती संख्या लक्षात घेता सप्तशृंगी निवासिनी देवीच्या विश्वस्त मंडळाने घेतला निर्णय.
-
मनसे प्रमुख राज ठाकरे आज नागपूरला जाणार
राज ठाकरे थोड्याच वेळात नागपूरकडे रवाना होणार
राज ठाकरे नागपूरसाठी मुंबई विमानतळाकडे निघणार आहेत
नागपूरमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार
राज ठाकरे यांच्या नागपूर दौऱ्याकडे महाराष्ट्राचं लक्ष
-
पुण्यातील कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभ परिसरात सभा घेण्यास बंदी
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाचा निर्णय
दरवर्षी 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे राज्याच्या विविध भागातून नागरिक येतात
स्तंभ परिसरात पहाटेपासूनच नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे या परिसरात कोणालाही सभा घेता येणार नाही
-
पुण्यातील गुंठेवारी प्रक्रिया सुटसुटीत करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
शिंदे गटाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी
महापालिकेनं अनियमित बांधकाम नियमित करण्याचं निश्चित केलं आहे
मात्र त्याची प्रक्रिया किचकट आहे. त्यामुळे गुंठेवारी सुटसुटीत करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलीय
-
कोरोनाच्या चौथ्या लाटेसाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासन सज्ज
अंबाबाई मंदिरात आजपासून कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती
विमानतळावरही परदेशातून येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू
मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे आवाहन
गरज वाटल्यास स्वॅब तपासणी होणार, कोल्हापूर जिल्ह्यात चिंतेची परिस्थिती नाही
-
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरला, माजी खासदार आनंद परांजपेंवर गुन्हा दाखल
आनंद परांजपेंकडून ट्विट करून अपशब्दाचा वापर
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील आणि कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी मानपाडा व रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली
मानपाडा पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्या विरोधात दखल पात्र गुन्हा दाखल
मुख्यमंत्री पदाचा अपमान केल्याबद्दल आनंद परांजपे यांच्या विरोधात मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा
बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी
Published On - Dec 23,2022 6:21 AM