Vidarbha Assembly Seats Results 2024 Highlights : तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार अखेर विजयी; कुठे घडली घटना?
विदर्भातील एकूण 62 जागांचे निकाल थोड्याच वेळात हाती येणार आहेत. राज्यातील पहिला निकाल विदर्भातूनच समोर येणार आहे. त्यामुळे विदर्भातील निकालाची बित्तंबातमी पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. तुम्हाला निकालाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर वाचायला मिळणार आहेत.
विदर्भातील एकूण 62 मतदारसंघाचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. विदर्भात कुणाचा दबदबा राहणार हे आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. विदर्भात एकूण 65.11 टक्के मतदान झालं होतं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे मतदान तीन टक्क्यांनी अधिक होतं. लाडकी बहीण योजनेमुळे मतांचा हा टक्का वाढला? की विदर्भात ओबीसी फॅक्टरने आपली जादू केली हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. तसेच भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार, काँग्रेस नेते नाना पटोले, माणिकराव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक दिग्गजांचं काय होणार? हे सुद्धा दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. त्यामुळे विदर्भातील निकालाची बित्तंबातमी पाहण्यासाठी आमच्यासोबत जोडून राहा. तुम्हाला निकालाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर वाचायला मिळणार आहेत
LIVE NEWS & UPDATES
-
खचून जाऊ नका, एकटे समजू नका; बच्चू कडू यांचा समर्थकांना दिलासा
सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो त्यांनी माझ्यासाठी प्रयत्न केले. माझ्या पराभवाने तुम्ही खचून जाऊ नका. बच्चू कडू पदामुळे नाही तर कार्यामुळे आहे. हे कार्य आपण पुढे करत राहू. तुम्ही स्वतःला एकटे समजू नका. आज हरलो तरी उद्या आपण जिंकू. कुठे चुकलो असेल, कुठे कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ, असं प्रहार जनशक्तीचे बच्चू कडू म्हणाले.
-
भाजपचे मिलिंद नरोटे विजयी, काँग्रेसला धक्का
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपचे डॉ. मिलिंद नरोटे विजयी. गडचिरोली विधानसभेत विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांचे तिकीट कापून भाजपने दिला होता नवा चेहरा. काँग्रेसचे उमेदवार मनोहर पोरेटी यांचा पराभव
-
-
राजुरामध्ये भाजपचे देवराम भोंगळे विजयी
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीच्या अंतिम काही फेऱ्यांमध्ये मोठा फेरबदल झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेले भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांनी मुसंडी मारत विजय केला संपादन केला आहे. सुमारे 2000 मतांनी भाजप उमेदवार देवराव भोंगळे विजयी झाले आहेत. शेवटच्या काही फेऱ्यांपर्यंत कधी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुभाष धोटे तर कधी शेतकरी संघटना नेते एडवोकेट वामनराव चटप यांच्यात चुरस होती. अचानक देवराव भोंगळे यांची झालेली सरशी जिल्ह्यात भाजपला बोनस देऊन गेली आहे.
-
धर्मरावबाबा अत्राम यांचा एकतर्फी मतांनी विजय; 17 हजार मतांचं मताधिक्य
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी मतदारसंघात धर्मराव बाबा आत्राम 53639 मतांनी विजय झाला. त्यांनी जवळपास 17 हजार मतांचं मताधिक्य घेऊन एकतर्फी विजयी मिळवला आहे. धर्मराव आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांना जवळपास 28 हजार मते मिळाली. तर धर्मराव आत्राम यांचे पुतणे अमरीश आत्राम यांना 36 हजार 916 मते मिळाली.
-
पहिल्याच फटक्यात रामदास मसराम विजयी
आरमोरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे रामदास मसराम 5534 मतांनी विजय झाले आहेत. दोन टर्म आमदार असलेले भाजपचे कृष्णा गजबे यांचा त्यांनी पराभव केला. रामदास मसराम हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून आरमोरी विधानसभेत उमेदवार होते.
-
-
नागपूर पश्चिममध्ये विकास ठाकरे आघाडीवर
काँग्रेसचे नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या 13 व्या फेरीत विकास ठाकरे यांना 10 हजार 138 मते पडली आहेत. या फेरीमध्ये भाजपला एक मताची आघाडी मिळाली आहे.
-
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, आईची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर काम केलं. त्यामुळे जनतेने महायुतीवर विश्वास टाकला. त्यामुळेच त्यांना मोठं यश मिळालं आहे. लोकांचं देवेंद्रवर प्रेम आहे. त्यामुळे देवेंद्रच मुख्यमंत्री होतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरीता फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
-
देवेंद्र फडणवीस 15,589 मतांनी आघाडीवर
नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांना 46,552 मते मिळाली आहेत. तर काँग्रेसच्या प्रफुल्ल गुढधे यांना 30, 963 मते मिळाली असून देवेंद्र फडणवीस यांना 15,589 मतांची आघाडी घेतली आहे.
-
देवेंद्र फडणवीस यांना आईचा फोन, दिल्या शुभेच्छा
भाजपला राज्यात न भूतो न भविष्यती यश मिळालं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने मोठं यश मिळवलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची आई सरीता फडणवीस यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा देतो. तर फडणवीस यांनी मी नागपूरला येणार आहे, असं आईला सांगितलं.
-
भाजप उमेदवार विनोद अग्रवाल यांना 6,668 मतांची आघाडी, कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष
गोंदिया विधानसभेचे भाजपचे उमेदवार आमदार विनोद अग्रवाल यांना 6668 मतांची सध्या आघाडी आहे. ही आघाडी मिळाल्यानंतर विनोद अग्रवाल यांच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला.
-
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आघाडीवर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कामठी मतदारसंघातून आघाडीवर आहे. त्यांनी तब्बल 6 हजार मतांची आघाडी घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर हे पिछाडीवर आहेत.
-
चंद्रपूरमध्ये भाजपला मोठा धक्का, उमेदवार पिछाडीवर
चंद्रपूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. भाजपचे उमेदवार किशोर जोरगेवार 113 मतांनी पिछाडीवर आहेत.
-
गोंदियात महायुतीला मोठा दिलासा, चारही उमेदवार आघाडीवर
गोंदियातील चारही जागांवर महायुतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे गोंदियात महायुतीचाच दबदबा असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
-
अमरावतीच्या अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर
अचलपूरमध्ये बच्चू कडू पिछाडीवर आहेत. भाजपचे प्रवीण काळे हे आघाडीवर आहेत.
-
धर्मरावबाबा अत्राम आघाडीवर, शरद पवार गटाला धक्का
अहेरी विधानसभा मतदारसंघातून अजितदादा गटाचे धर्मरावबाबा अत्राम आघाडीवर आहेत. त्यांनी 1142 मतांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्याविरोधात त्यांची मुलगी आणि शरद पवार गटाची उमेदवार भाग्यश्री अत्राम लढत आहे.
-
अनिल देशमुख यांच्या हातून काटोल जाणार की राहणार?; मुलाला मोठा धक्का
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख काटोलमधून पिछाडीवर आहेत. टपाल मतमोजणीत सलील हे मागे पडले आहेत. त्यामुळे काटोल देशमुख कुटुंबाच्या हातून जाणार की राहणार? अशी चर्चा सुरू झाली आहे.
-
काँग्रेसच्या नितीन राऊत यांना मोठा दिलासा
उत्तर नागपूर मतदारसंघात काँग्रेसचे नितीन राऊत पोस्टल मतांमध्ये आघाडीवर आहेत.
-
हिंगोलीत मतमोजणीच्या पूर्वी संतोष बांगर यांचा महादेव मंदिरात जप
शिंदे गटाचे उमेदवार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरातील कयाधू अमृतधारा महादेव मंदिरात पूजा अर्चा केली. कळमनुरी विधानसभेत शिवसेना विरुद्ध शिवसेना संतोष बांगर विरुद्ध संतोष टारफे अशी झाली लढत आहे.
-
पोस्टल मतमोजणीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर
नागपूर-दक्षिण पश्चिममधून देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. पोस्टल मतमोजणीत देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. तर साकोलीत काँग्रेसचे नाना पटोले आघाडीवर आहेत.
-
विदर्भातील 11 जिल्ह्यातील मतदान किती टक्के होतं?
विदर्भातील 11 जिल्ह्यातील एकूण मतदान
नागपूर जिल्ह्यात 60.49 टक्के मतदान
वर्धा जिल्ह्यात 68.30 टक्के मतदान
वाशिम जिल्ह्यात 66.01 टक्के मतदान
यवतमाळ जिल्ह्यात 69.02 टक्के मतदान
बुलढाणा जिल्ह्यात 70.32 टक्के मतदान
चंद्रपूर जिल्ह्यात 71.27 टक्के मतदान
गडचिरोली जिल्ह्यात 73.68 टक्के मतदान
गोंदिया जिल्ह्यात 69.53 टक्के मतदान
अकोला जिल्ह्यात 64.98 टक्के मतदान
अमरावती जिल्ह्यात 65.57 टक्के मतदान
भंडार जिल्ह्यात 69.42 टक्के मतदान
-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निकालासाठी वेबसाईट
महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच आज सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे. या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे.
-
लाडकी लेक जिंकणार की बापाची सरशी? अहेरीत काय घडणार?
अहेरी विधानसभा मतदारसंघांच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अहेरीत अजितदादा गटाचे धर्मरावबाबा अत्राम निवडणूक लढत आहे. त्यांच्या विरोधात त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम लढत आहे. त्यामुळे विदर्भात लाडकी लेक जिंकणार की बापाची सरशी होणार याकडे संपूर्ण लक्ष लागलं आहे.
-
विदर्भात काऊंटडाऊन सुरू, दिग्गजांचं काय होणार?
विदर्भातील निकालाचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. विदर्भात अनेक दिग्गज निवडणुकीच्या मैदानात आहेत. देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड, अमोल मिटकरी, बच्चू कडू, विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्यासह अनेक दिग्गजांचा फैसला थोड्याच वेळात होणार आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Published On - Nov 23,2024 7:02 AM