Nagpur Gram Panchayat Election Results 2021: फडणवीसांच्या जिल्ह्यातील गावांचा कारभारी कोण होणार?, निकालाकडे सर्वांचं लक्ष

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: पूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेल्या 32 जिल्ह्यांमधील 12 हजार 711 ग्रामपंच्यायतींचा आज निकाल (18 जानेवारी) लागणार आहे. (nagpur gram panchayat elections)

Nagpur Gram Panchayat Election Results 2021:  फडणवीसांच्या जिल्ह्यातील गावांचा कारभारी कोण होणार?, निकालाकडे सर्वांचं लक्ष
Follow us
| Updated on: Jan 18, 2021 | 7:14 AM

नागपूर : संपूर्ण राज्याला प्रतिक्षा असलेल्या 32 जिल्ह्यांमधील 12 हजार 711 ग्रामपंच्यायतींचा आज निकाल (18 जानेवारी) लागणार आहे. मतमोजणीसाठी लागणारी यंत्रणा, प्रशाकीय व्यवस्था यांची संपूर्ण तयारी आली आहे. मात्र, आजच्या धामधुमीत नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. येथे महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली असून देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) जिह्यातील गावांचा कारभारी कोण होणार?, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. (in the nagpur district of Devendra Fadnavis who will win gram panchayat elections)

3015 उमेदवारांचा फैसला

नागपूर जिल्ह्यात एकूण 127 ग्रामपंचायतींसाठी 16 जानेवारी रोजी मतदान झाले. यावेळी मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मत दिले. त्यानंतर आता सर्वांना निवडणुकीच्या निकालाची प्रतिक्षा होती. नागरिकांची ही प्रतिक्षा संपणार असून आज जिल्ह्यात 13 ठिकाणी मतमोजणी होणार आहे.  येथे जिल्ह्यातील एकूण 127 ग्रामपंचायतींमध्ये 1086 जागांसाठी मतमोजणी होईल. या जागांना जिंकण्यासाठी ग्रामपंचायतीत निवडणुकीच्या मैदानात एकूण 3015 उमेदवार उतरले होते. या सर्वांच्या भवितव्याचा आज फैसला होईल. नागपुरात 78.76 टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, प्रत्यक्ष मतदानाआधी जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं होतं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीशी दोन हात करत येथील सर्व ग्रामपंचायतींवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी स्थानिक नेत्यांना बळ पुरवलं होतं. तर काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणजेच महाविकास आघाडीनेही फडणवीसांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या या जिल्ह्यात आपले प्रस्थ निर्माण करण्याठी मतदारांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर 16 जानेवारीला येथील सर्व 127 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले.आज प्रत्यक्ष मतमोजणी म्हणजे निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | ग्रामपंचायत निवडणुका 2021 निकाल लाईव्ह

Nagpur| नागपुरातील बावनकुळेंच्या कोराडी ग्रामपंचायतीकडे अनेकांच्या नजरा

Nagpur | ग्रामपंचायतीचा अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस, उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग-

(in the nagpur district of Devendra Dadnavis who will win gram panchayat elections)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.