नागपूर मनपा निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचा आघाडीसाठी हात पुढे, आता काँग्रेस म्हणते, 156 जागांसाठी…

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.

नागपूर मनपा निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचा आघाडीसाठी हात पुढे, आता काँग्रेस म्हणते, 156 जागांसाठी...
प्रकाश आंबेडकर आणि विकास ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 3:08 PM

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आघाडी करण्याबाबत दिलेल्या ऑफरवर नागपूर काँग्रेसने (Nagpur Congress) ‘वेट ॲंड वॅाच’ची भूमिका घेतली आहे. नागपूर महापालिका निवडणुकीत (Nagpur Municipal Corporation Election) 156 जागांसाठी काँग्रेसकडे 1500 च्या वर अर्ज येणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची लेखी मतं जाणून घेणार आणि हायकमांडला अहवाल पाठवणार’ असं काँग्रेस नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये वंचित आणि काँग्रेसची आघाडी होणार का, महाविकास आघाडीचं काय होणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते?

राज्यातील आगामी महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षासोबत आघाडी करण्याची आमची इच्छा आहे. तसा प्रस्ताव एक महिन्यापूर्वीपासून काँग्रेसच्या प्रदेश नेतृत्वाकडे दिलेला आहे. मात्र एक महिना उलटूनही काँग्रेसकडून प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीने राज्यात सर्वत्र कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. महापालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. दरम्यान अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस सोबत आघाडीचा आमचा प्रस्ताव अजूनही कायम असल्याची माहिती आंबेडकर यांनी दिली.

विकास ठाकरेंची भूमिका काय?

‘नागपूर महापालिका निवडणुकीत 156 जागांसाठी काँग्रेसकडे 1500 च्या वर अर्ज येणार आहेत. काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना स्वतंत्र निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. त्यामुळे आगामी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत वंचितसोबत आघाडी करण्याबाबत काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांची लेखी मतं जाणून घेणार आणि हायकमांडला अहवाल पाठवणार’ असं काँग्रेस नागपूर शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

‘आगामी निवडणुकांत वंचितची Congress पक्षासोबत आघाडी करण्याची इच्छा’

उत्तर प्रदेश निवडणुकीत वंचितचा समाजवादी पार्टीला पाठिंबा, बसपा आणि भीम आर्मीबद्दल आंबेडकर नेमके काय म्हणाले?

टिपू सुलतानच्या मुद्यावर भाजप तोंडघशी पडलंय, पेगाससवरुन ही प्रकाश आंबेडकरांचं टीकास्त्र

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.