महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?

नागपूरकरांना डिजिटल करन्सीमध्ये गुंतवणूक (investment in cryptocurrency) करण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी महाठग निशीद वासनिकला पोलिसांनी लोणावळ्यातून अटक केली. पोलिसांनी वासनिकच्या टोळीतील अन्य दहा जणांना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एक कोटी चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

महाठग निशीद वासनिकला ठोकल्या बेड्या, नागपूरच्या पोलिसांची लोणावळ्यात कारवाई, गुंतवणूकदारांची कशी केली होती फसवणूक?
नागपूर पोलीस मुख्यालय
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 11:59 AM

नागपूर : पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Commissioner of Police Amitesh Kumar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २0२0 मध्ये इथर ट्रेडच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे फसवणूक प्रकरण समोर आलं. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार निशीद वासनिक (Mahathag Nishid Wasnikla ) याने इथर ट्रेड एशिया नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीत त्याने डिजिटल करन्सीत गुंतवणूकदारांना (investment in cryptocurrency) टार्गेट केले. गुंतवणूकदारांना पैशांचे आमिष दाखविले. पैसे मिळणार असल्यामुळे वासनिकने लोकांना आकर्षित करेल, अशी विश्‍वासार्ह वेबसाइटही तयार केली. क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास शंभर दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे त्याने आमिष दाखविले. या वेबसाईटमध्ये तसे दाखविण्यात आले होते. या सर्व खोट्या भूलथापांना बळी पडून जवळपास दीड हजारांवर गुंतवणूकदार बळी पडले. वासनिकच्या वेबसाईटवर विश्‍वास ठेवून त्यांनी गुंतवणूक केली. त्यानंतर वासनिक हा मार्च २0२१ च्या अखेरीस पैसे घेऊन पसार झाला.

एक कोटींवर मुद्देमाल जप्त

या प्रकरणी फिर्यादी नीलेश नरहरी मोहाडीकर (रा. पंचवटीनगर, बिनाकी ले-आउट) यांच्यासह अन्य गुंतवणूकदारांनी यशोधरानगर पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील फुलारी, उपायुक्त डॉ,अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर पर्वते, गणेश पवार, उपनिरीक्षक मोहेकर, बलराम झाडोकार, प्रशांत कोडापे, प्रवीण चव्हाण, श्याम कडू यांनी वासनिकचा शोध सुरू केला. वासनिक आणि त्याच्या साथीदारांकडे एक पिस्टल, सात जिवंत काडतुसे, जग्वार कार, चार लग्झरी वाहने, अठरा लाख रुपये रोख, दागिने, मोबाईल, असा एकूण एक कोटी चौदा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

असा केला सर्जीकल स्ट्राईक

निशीद वासनिक हा लोणावळ्यातील एका फार्म हाऊसमध्ये साथीदारांसह असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. वासनिकसोबत गुंड, पिस्टल, तसेच शस्त्र असल्याची माहिती होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव कुमार यांच्याशी संपर्क साधला. त्याच्याकडून शिघ्र कृती दलाची चमू मागवून घेतली. शुक्रवारी पहाटे दोन वाजता पोलिसांनी वासनिकच्या बंगल्यावर धडक दिली. घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली. पोलीस बंगल्यात शिरल्यानंतर पोलिसांना वासनिकसह अन्य अकरा आरोपी आढळले. या सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली. या आरोपींमध्ये प्रगती निशीद वासनिक, गजानन मुनगुने, कल्पनी मुनगुने, संदेश लांजेवार, दीक्षा लांजेवार, महादेव वासनिक, ललित नाईक, दीपक नाईक, सचिन वासनिक आणि रामू वनवे यांचा समावेश आहे.

Nagpur Corona | नागपूर जिल्ह्यात आजपासून कोविड निर्बंध शिथिल, काय राहणार नवीन नियमावली?

Nagpur | वर्षातून तेरा दिवस वाजवा रे वाजवा!, पण, मर्यादेचे पालन करा, केव्हा वाजविता येणार दिवसभर ध्वनिक्षेपक?

नागपूर-अमरावती महामार्गावर कार ट्रेलरवर आदळली, पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.