Nagpur Petrol Diesel | नागपुरातील अनेक पेट्रोलपंप ड्राय, तेल कंपन्यांकडून एक-दोन दिवसाआड पुरवठा, डिझेल नसल्याने वाहनचालकांचा मनस्ताप

इंधन दरकपातीविरोधात पेट्रोलपंप चालक-मालक आक्रमक झालेत. दरकपातीविरोधात फामपेडा संघटनेचा नो पर्चेसचा निर्णय घेण्यात आलाय. 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी केली जाणार नाही. अशी माहिती फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.

Nagpur Petrol Diesel | नागपुरातील अनेक पेट्रोलपंप ड्राय, तेल कंपन्यांकडून एक-दोन दिवसाआड पुरवठा, डिझेल नसल्याने वाहनचालकांचा मनस्ताप
आजचे पेट्रोल, डिझेलचे भाव Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 6:16 PM

नागपूर : डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नाही. नागपुरातील अनेक पेट्रोलपंपावर डिझेलचा तुटवडा आहे. गेल्या काही दिवसांपासून तेल कंपन्यांकडून एक दोन दिवसाआड डिझेलचा पुरवठा होत आहे. नागपुरातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेलचा तुटवडा आहे. पेट्रोलियम कंपन्यांना (Petroleum Companies) डिझेलची दरवाढ हवी आहे. कंपन्या पेट्रोलपंपांना पुरेशा प्रमाणात पुरवठा करत नसल्याचं, पेट्रोलपंप चालकांचं म्हणणं आहे. नागपुरात डिझेल तुटवडा आहे. यामुळे वाहनचालकांना (Drivers) मनस्ताप सहन करावा लागतोय. डिझेल मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना (Farmers) त्यांच्या कामात अडथळा निर्माण होतोय.

काही पेट्रोलपंपांवर डिझेल नाही

खासगी पेट्रोल पंपांना डिझेल-पेट्रोलचा पुरवठा कमी करण्यात येत आहे. त्यामुळं काही पेट्रोलपंप बंद पडलेत. नागपूर पेट्रोल पंप संचालक आणि पुरवठादार कंपनीच्या अधिकाऱ्यांमध्ये नुकतीच बैठक झाली. त्यातूनही काही मार्ग निघू शकला नाही. नागपूर, अमरावतीसह राज्यातील बहुतेक खासगी पेट्रोलपंच चालकांची अशीच काहीशी स्थिती आहे.

शेतीची कामे खोळंबली

सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे. ट्रॅक्टरनं नांगरणी केली जाते. ट्रॅक्टर चालविण्यासाठी डिझेल लागते. पण, ते मिळत नसल्यानं त्यासाठी पंपांवर फिरावे लागत आहे. काही जण गुमान परत येतात. त्यामुळं शेतीची कामं खोळंबली आहेत. राज्यात सुमारे सहाशेच्यावर खासगी पेट्रोलपंप आहेत. मोठ्या कंपनीकडून पंपांना डिझेलचा पुरवठा होत नसल्यानं ही टंचाई निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

उद्या नो पर्चेसचा निर्णय

इंधन दरकपातीविरोधात पेट्रोलपंप चालक-मालक आक्रमक झालेत. दरकपातीविरोधात फामपेडा संघटनेचा नो पर्चेसचा निर्णय घेण्यात आलाय. 31 मे रोजी तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलची खरेदी केली जाणार नाही. अशी माहिती फामपेडा संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली. देशभरातील पेट्रोलपंपमालक सहभागी होणार आहेत. नो पर्चेस असं हे आंदोलन आहे. तीन मे रोजी माल खरेदी करणार आहोत. देशभरातील पेट्रोलपंपचालकांची आंदोलन आहे. राज्यातील साडेसहा हजार पेट्रोलपंपमालक यात सहभागी होतील, असंही उदय लोध यांनी सांगितलं.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.