Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत

नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी आज एका व्यायामशाळेचे लोकार्पण केले. त्यावेळी त्यांनी व्यायामशाळेतील साहित्यांवर व्यायाम केला. येत्या मनपा निवडणुकीसाठी सज्ज असलल्याचे यातून त्यांनी दाखवून दिले. भाजप निवडणूक लढण्यास सक्षम आहे, असा संकेत यातून त्यांनी दिला.

Nagpur | महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यायामशाळेत काढला दम! मनपा निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे दिले संकेत
नागपुरात व्यायामशाळेच्या लोकार्पणाप्रसंगी व्यायाम करताना महापौर दयाशंकर तिवारी.
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 4:53 PM

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नागपूर महापालिकेच्यावतीने (Nagpur Municipal Corporation) प्रभाग क्र. 19 अंतर्गत बजेरीया येथील नन्हुमल इमारतीजवळील राजकुमार गुप्ता समाजभवन व्यायामशाळा ( Rajkumar Gupta Samaj Bhavan) तयार करण्यात आली. महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांच्या हस्ते जय बजरंग व्यायामशाळेचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले. यावेळी व्यायाम करून आपण निवडणुकीसाठी सज्ज अशल्याचे महापौर तिवारी यांनी दाखवून दिले. कार्यक्रमाला मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक, विनायकराव डेहनकर, ब्रजभूषण शुक्ल अजय गौर, हरीश महाजन आदी उपस्थित होते.

समाजभवनाचा व्यायामशाळेसाठी उपयोग

महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, बजेरिया येथील राजकुमार गुप्ता समाजभवनमधून प्रभागातील जनतेला अनेक सुविधा प्रदान करता आलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटाचा सामना करताना नागरिकांना लसीकरण उपलब्ध व्हावे यासाठी या समाजभवनामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. चोवीस हजारावर लोकांचा जीव वाचविण्यासाठी लसीकरणाचे कार्य समाजभवनातून झाले आहे. समाजभवनमध्ये लग्न कार्य व इतर कार्य व्हायचे. यामध्ये असामाजिक तत्वांचा वावर असल्याने नागरिकांना त्रास व्हायचा.

नागरिकांच्या तक्रारींची दखल

नागरिकांच्या तक्रारीवर दखल घेत सभागृहाची स्वच्छता करून येथील नागरिकांच्या सुविधेसाठी व्यायामशाळा तयार करण्याचे निश्चित झाले. या व्यायामशाळेत आधुनिक उपकरणे, प्रशिक्षकांची व्यवस्था आणि व्यायामशाळेचे योग्य संचालन व्हावे, यासाठी 150 रुपये एवढे नाममात्र शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार विकास कुंभारे यांनी यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या नेतृत्वात शहरात सुरू असलेल्या विकास कामांची प्रसंशा केली. मध्य नागपुरातील भागांमध्ये होत असलेल्या विकास कामांसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

एका चुकीची शिक्षा 18 लाख गरिबांना?, नागपुरात वेळेत उचल न केल्याने जानेवारीचे मोफत रेशन नाही

नागपूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या निवडणुकांची रणधुमाळी, प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

नागपूरमध्ये एरो मॉडेलिंग शोचा थरार पाहता येणार! क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.