40 वाघांचे स्थालांतर केले, आता जखमी वाघांसाठी रेस्क्यू, काय पुन्हा ठाकरे गटात फूट पडणार?

जंगलातला वाघ असो की राजकारणातला असो.. चाळीस वाघांचे स्थलांतर झाले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत.

40 वाघांचे स्थालांतर केले, आता जखमी वाघांसाठी रेस्क्यू, काय पुन्हा ठाकरे गटात फूट पडणार?
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 4:31 PM

नागपूर : वाघांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मग तो वाघ जंगलातला असो की राजकारणातला असो.. चाळीस वाघांचे स्थलांतर झाले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. त्या ठिकाणी त्यांच्यांवर योग्य उपचार केला जाईल, असे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या खात्यातील भाषेत आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. आता जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर कुठे उभारणार? या वक्तव्याचा राजकीय अर्थ काढला जात आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.

पोटनिवडणुकीत भाजचा विजय

हे सुद्धा वाचा

निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष आणि उमेदवार गांभीर्याने लढतो. कोणती ही निवडणूक हास्य जत्रा नाही. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणूक आम्ही मित्र पक्षांसोबत गांभीर्याने लढत आहोत. अर्थात विरोधात असणारी महाविकास आघाडीही पुर्ण ताकदीने लढत आहे.

जनता कोणाला आशीर्वाद देईल, हे मतमोजणीला स्पष्ट होईल. परंतु मला विश्वास आहे की मतदारसंघात वेगाने काम करण्यासाठी जनता भाजप शिवसेनेला आशीर्वाद देईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अनुमती घेऊनच मी अनुपस्थित आहे. काही पूर्व नियोजित कार्यक्रम विदर्भात होते. म्हणून मी आलो असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

अजित दादांची विश्वसनीयता संपवायची होती का?

राष्ट्रपती राजवट हटवायची होती म्हणून सरकार बनवलं, हे पवारांनी केले वक्तव्य खरं वाटत नाही. त्यासाठी त्यांनी अजित पवार यांचा वापर केला. म्हणजे अजीत पवार यांची विश्वसनीयता संपवायची होती का? राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी हे अजित पवारांना वापरलं गेलं का ?

मला देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीच्या दिवशीच सांगितलं होतं, की शरद पवार सोबत आहे, त्यामुळे सरकार बनतेय. परंतु पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजितदादा यांची विश्वसनियता संपवण्याचा प्रयत्न होता का? हे पाहावे लागणार आहे. भविष्यात भाजप आणि शिवसेना ( शिंदे ) हेच सोबत राहणार आहे. पुढील निवडणुकीत आम्हीच सरकार आणू, असे त्यांनी सांगितले.

राऊत यांची धमकी

संजय राऊत यांच्या धमकीचा प्रकरण गंभीर आहे की नाही, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. या प्रकरणांमध्ये सत्यता आहे की नाही याचा तपास झाला पाहिजे. अन्यथा एक नवीन फॅशन सुरू होईल. आरोप करायचा आणि मात्र आरोपासंदर्भात माहितीचा स्त्रोत सांगायचाच नाही. संजय राऊत यांच्यांकडे जी माहिती असेल ती पोलिसांनी त्यांच्यांकडून घेतली पाहिजे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.