खासदार कृपाल तुमानेंची जीभ घसरली, म्हणाले, कंगना राणावतला मीडियानं महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई

नागपूर : चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून विवादित बयाण देत आहे. कंगना राणावतला मीडियानं फारस महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई आहे, अशा शब्दांत रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी तिचा खरपूस समाचार घेतला. तिनं सत्ताधारी नेत्याच्या मागे लागून त्यांचे पाय चाटून पुरस्कार मिळविला असल्याचं कृपाल तुमाने म्हणाले. कंगना राणावतनं या आधी महात्मा […]

खासदार कृपाल तुमानेंची जीभ घसरली, म्हणाले, कंगना राणावतला मीडियानं महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई
Follow us
| Updated on: Nov 18, 2021 | 1:12 PM

नागपूर : चित्रपट अभिनेत्री कंगना राणावत गेल्या काही दिवसांपासून विवादित बयाण देत आहे. कंगना राणावतला मीडियानं फारस महत्त्व देऊ नये, ती हलकट बाई आहे, अशा शब्दांत रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी तिचा खरपूस समाचार घेतला. तिनं सत्ताधारी नेत्याच्या मागे लागून त्यांचे पाय चाटून पुरस्कार मिळविला असल्याचं कृपाल तुमाने म्हणाले.

कंगना राणावतनं या आधी महात्मा गांधींबद्दल सुद्धा वक्तव्य केलं. इंस्टाग्राम पोस्टवर तिनं महात्मा गांधी यांना सत्तेची भूक होती, असं म्हटलं. तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये शहीद भगतसिंग यांना फाशी व्हावी, असं महात्मा गांधी यांना वाटत होते, अशी रीही ओढली. त्यावरून कंगना राणावतवर चौफेर टीका होत आहे. महात्मा गांधींबद्दल बोलण्याची तिची औकात नाही. अशा हलकट बाईबद्दल मला बोलायचं नाही, असंही शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

काय म्हणाले कृपाल तुमाने ?

महात्मा गांधी यांना सत्तेची भूक असती तर ते कोणतेही महत्त्वाचे पद घेऊ शकत होते. महात्मा गांधीजी सत्तेचे लालची असते, तर त्यावेळी ते पंतप्रधान, राष्ट्रपती काहीही होऊ शकले असते, असे मत कृपाल तुमाने यांनी व्यक्त केले. कंगनाला पद्मश्री पुरस्कार कसा मिळाला, हे सर्व खासदारांना माहीत आहे. त्यासाठी ती कुणाचे पाय चाटत होती, असंही तुमाने म्हणाले. तुमाने फारसे वादग्रस्त वक्तव्य करीत नाहीत. मात्र, कंगनाच्या बाबतीत त्यांनी अतिशय तिखट प्रतिक्रिया दिली.

काय म्हणाली होती कंगना ?

सुभाषचंद्र बोस आणि भगतसिंह यांना महात्मा गांधी यांनी कोणतेही समर्थन दिलं नाही. महात्मा गांधी यांच्या अहिंसा नितीची मजाक कंगनानं उडविली. एक गाल दिल्यास तुम्हाला भिक मिळेल, स्वातंत्र्य नाही, असंही कंगना राणावत म्हणाली होती. त्यामुळं तुम्हाला महात्मा गांधी हवेत की, भगतसिंह हे निवडावं लागेल, असंही ती म्हणाली होती. यापूर्वी एका कार्यक्रमात 1947 ला जे स्वातंत्र्य मिळालं होतं, ती भिक होती. खरे स्वातंत्र्य 2014 ला मिळाल्याचं कंगना म्हणाली होती. अशा तिच्या बेताल वक्तव्याचा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही चांगलाच समाचार घेतला.

कुरिअर उघडताच सावधान! नागपुरात चक्क कुरिअरमधून विषारी कोब्य्राचं पार्सल, कुणाला संपवण्याचा घाट?

रविकांत तुपकर यांचे बुलडाण्यातून आंदोलन, नागपूर पोलिसांनी घेतले होते ताब्यात

नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.