“महाराष्ट्रातल्या 5 ठिकाणी महाविकास आघाडी मजबूत ताकदीने लढणार”; मविआने पदवीधर निवडणुकीवर आपला हक्क सांगितला
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे आदेश दिले आहेत, त्याच प्रमाणे आम्ही सर्वजण पालन करत आहेत. मात्र दुर्दैवी हे आहे की नाशिक मतदार संघात भाजपला उमेदवार मिळाला नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
नागपूरः सध्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकींवरून जोरदार राजकीय वातावरण तापले आहे. नाशिक मतदार संघावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीही झडत आहेत. त्यातच आज नाशिकच्या उमेदवाराविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी यावेळी महाविकास आघाडीचाच उमेदवार या निवडणुकीत यशस्वी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे विनायक राऊत यांनी भाजपवर टीका करत नाशिक मतदार संघात भाजपला उमेदवारच मिळाला नाही हे दुर्देवी असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
नाशिक उमेदवाराविषयी विश्वास व्यक्त करत खासदार विनायक राऊत यांनी महाराष्ट्रातल्या पाच ठिकाणी महाविकास आघाडी मजबूत ताकदीने लढत असल्याचे सांगितले.
तर सर्व निवडणुका महाविकास आघाडीने लढायच्या आणि जिंकायच्या आहेत. असा पक्षप्रमुखांनी आदेश दिले आहेत की सर्व उमेदवारांना पाठिंबा द्यायचा आहे आणि संपूर्ण पाठिंबा देऊन त्यांना जिंकून आणायचे आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केल आहे.
पदवीधर मतदार संघातील उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीकडून कशा पद्धतीन हालचाली चालू केल्या आहेत. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणा असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले असल्यामुळे त्यादृष्टीने प्रयत्न चालू असल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या प्रमाणे आदेश दिले आहेत, त्याच प्रमाणे आम्ही सर्वजण पालन करत आहेत. मात्र दुर्दैवी हे आहे की नाशिक मतदार संघात भाजपला उमेदवार मिळाला नसल्याचे म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
धनुष्यबाणावर न्यायालय का निर्णय देणार या विषयी बोलताना त्यांनी धनुष्यबाणाच्या निर्णयावर आम्हाला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगत भविष्यामध्येही उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख असतील मात्र विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही त्यामुळे विरोधकांना आम्ही त्यांना भाव देत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
तर केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारावर बोलताना त्यांनी सांगितले की, केंद्रात मंत्री मंडळ विस्तार होईल तेव्हा होईल पण शिंदे गटातील खासदारांना मंत्री मंडळात जागा मिळेल असं म्हणत आहेत पण हे केवळ गाजर दाखवण्याचे काम करत असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे.