मनपा निवडणुका लांबणीवर! पाच राज्यांच्या निकालाने भाजप जोरात, काँग्रेसच्या उभेच्छुकांचा उत्साह मावळला?

पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. चार राज्यांमध्ये भाजपची सत्ता येईल, अशी स्थिती आहे. त्यामुळं नागपुरात काँग्रेसच्या उभेच्छुकांचे मनोबल खचले आहे. भाजपने होळीपूर्वीचं गुलाल उधळला. पुढची मनपा निवडणूक आपणच जिंकणार असा उत्साह भाजप कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.

मनपा निवडणुका लांबणीवर! पाच राज्यांच्या निकालाने भाजप जोरात, काँग्रेसच्या उभेच्छुकांचा उत्साह मावळला?
नागपूर महापालिकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 5:00 AM

नागपूर : महापलिका निवडणूक ( Municipal Corporation elections) एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता होती. पण, ही निवडणूक सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळं उभेच्छुक शांत बसले आहेत. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल (results) जाहीर झाले. या निकालाने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह बळावला आहे. भाजपला अच्छे दिन येणार अशी स्थिती आहे. यापूर्वी नागपूर मनपात तीन टर्म भाजपची सत्ता आहे. यावेळी मनपामध्ये सत्तेचा चौकार मारण्याची तयारी भाजपनं (BJP) सुरू केली आहे. पण, निवडणुका लांबणीवर पडल्याने भाजपचे उत्सुकही सध्या शांत बसले आहेत. तिकीट मिळणार की, नाही. त्यासाठी काय करावे लागेल. याचे आराखडे आखले जात आहेत. दक्षिण नागपुरातील छोटू भोयर आणि सतीश होले यांनी भाजपला जय महाराष्ट्र केला. पण, आता भाजपमधून बाहेर पडून काही उपयोगाचे नाही, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत. पक्षात राहून जुळवून घेण्याकडं त्यांचा कल दिसून येत आहे. कारण काँग्रेसचे इतर राज्यांतील निवडणुकीत पानिपत झाले. हीच शक्यता नागपूरबाबतही होणार तर नाही, असं त्यांना वाटू लागलंय.

सहा महिने कसे जुळवून घेणार

निवडणुका लांबणीवर जाणार असल्यानं नगरसेवक व मोजकेच नेते प्रभागात दिसतात. आमदार, मंत्री यांच्याकडे तिकिटासाठी सेटिंग लावणारेही शांत झाले. काही जण तिकीट मिळेल या आशेवर तयारीला लागले आहेत. बहुतेक मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. सर्व अधिकार राज्य सरकारने आपल्याकडे घेतलेत. निवडणूक ऑगस्ट महिन्यात होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सहा महिने मतदारांना जोडून धरणे सोपे काम नाही.

घरोघरी भेटीवर भर

महापालिकेत प्रशासन बसल्यानं नगरसेवकांचे अधिकार संपले. प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी त्यांना प्रशासनावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळं नागरिकांवर फारसा प्रभाव पाडू शकणार नाही. तरीही शक्य त्या समस्या सोडविण्यासाठी काही माजी झालेले नगरसेवक प्रयत्न करत आहेत. घरोघरी भेटी देण्यावर भर देत आहेत.

Maharashtra Budget 2022 : राज्याच्या अर्थसंकल्पातून विदर्भाला काय मिळाले? वाचा दहा महत्त्वाच्या घोषणा

भंडाऱ्यातील जवानाचा कुपवाडा येथे वाहन अपघातात मृत्यू! जम्मू काश्मीरमध्ये होता कार्यरत

Maharashtra Budget 2022 : गोसेखुर्द प्रकल्पासाठी 850 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, विदर्भासाठीच्या पाच महत्त्वाच्या घोषणा काय?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.