नागपूर-अमरावती महामार्गावर कार ट्रेलरवर आदळली, पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

नागपूर-अमरावती मार्गावर शनिवारी दुपारी अपघात झाला. या अपघातात कार आई-वडिलासह पाच महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. कोंढाळीजवळ झालेल्या या भीषण अपघातात नात्यातील मुलगी जखमी झाली. कोंढाळी येथील लग्नसमारंभ आटोपून हे दाम्पत्य मुलांसह कळमना येथे परत येत होते.

नागपूर-अमरावती महामार्गावर कार ट्रेलरवर आदळली, पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू
कोंढाळीजवळील अपघातात कारचा चेंदामेंदा झाला.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:36 AM

नागपूर : कळमना येथील रोशन रामाजी तागडे (Roshan Tagade) हे कोंढाळी येथे लग्नाला गेले होते. कार्यक्रम आटोपून नागपूरकडे कारने शनिवारी परत येत होते. बाजारगावजवळच्या अमरीश धाब्याजवळ (Bazargaon Amrish Dhaba) पुण्यावरून कळमेश्‍वरकडे ट्रेलर येत होता. लोंखडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलरच्या चालकाने ट्रेलर अचानकपणे रस्त्यावर उभा केला. यामुळे कारचालक रोशनला अचानक रस्त्यावर उभा असलेला ट्रेलरला पाहून आपल्या वाहन अचानक थांबवावे लागले. यामुळं संतुलन बिघडल्याने ट्रेलरच्या मागील भागाला जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा चेंदामेंदा (Car crash) झाला. कारमधील चालक रोशन तागडे व त्याचा राम नावाचा पाच महिन्यांचा मुलगा जागीच ठार झाला. तर पत्नी व पुतणी जोया आकाश मेश्राम गंभीर जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान पत्नी आचल तागडे यांचा मेयो रुग्णालयात मृत्यू झाला.

ट्रेलर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

कोंढाळी पोलिसांनी माहिती झाल्यानंतर घटनास्थळ गाठले. राष्ट्रीय महामार्ग मोकळा करून जखमींना रुग्णवाहिकेने नागपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतकांना शवविच्छेदनासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. घटनेचा पंचनामा करून व ट्रेलर चालक राजेश ठवरे यांच्यावर गुन्हा दाखल केला. ठाणेदार चंद्रकांत काळे यांच्या मार्गदर्शनात भोजराज तांदूळकर व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.

शनिवार ठरला अपघातवार

गेल्या शनिवारी याच राष्ट्रीय मार्गावर अपघात झाला होता. त्यावेळी तिघांचा मृत्यू झाला. अकोल्याहून नागपूरकडे येणाऱ्या कारचा टायर फुटला. त्यामुळं गाडी कोलांटउड्या खात डिव्हायडरला आदळली. या अपघातात अनुपम गुप्ता, त्यांची पत्नी रेणू गुप्ता व मुलगा अक्षद गुप्ता या तिघांचा मृत्यू झाला. कारचालक अर्चना अग्रवाल या जखमी झाल्या होत्या. अर्चना आणि रेणू या सख्या बहिणी होत्या. या दोन्ही घटनांमुळं हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा महामार्ग ठरत आहे.

पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार, आणखी राज्यात किती प्रकल्प आणि निधीची व्यवस्था काय?

चंद्रपूर जिल्ह्यात वाघ-बिबट्यांची दहशत, दोन दिवसांत तिघांचा घेतला जीव, वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला?

घरकुलाचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार, प्राजक्त तनपुरे यांनी दिले आश्वासन, नागपुरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.