पक्ष- चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर अनिल देशमुखांनी बॉम्ब फोडला; म्हणाले…

Anil Deshmukh on Election Commission Decision about NCP Symbol and Name Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत काल निर्णय आला. पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडून अजित पवार गटाला देण्यात आलं. या निर्णयानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली. वाचा...

पक्ष- चिन्ह अजित पवार गटाला गेल्यानंतर अनिल देशमुखांनी बॉम्ब फोडला; म्हणाले...
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 10:57 AM

सुनिल ढगे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, नागपूर | 07 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा काल संध्याकाळी निर्णय आला. अजित पवार गट हाच राष्ट्रवादी पक्ष आहे आणि घड्याळ चिन्हही अजित पवार गटाचं आहे, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यावर माजी मंत्री आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांची पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली. मोठा दावा करत त्यांनी बॉम्ब फोडला आहे. काही आमदार निधीसाठी अजित पवार यांच्यासोबत गेले. पण आता मात्र लवकर मोठ्या प्रमाणात घर वापसी होईल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं अनिल देशमुख म्हणाले.

देशात सूड बुद्धीचं राजकारण- देशमुख

सर्व ठरलेल्या प्रमाणे सूड बुद्धीचं राजकारण सुरू आहे आधी ठाकरे ची शिवसेना शिंदे यांना दिली. आता आमचा पक्ष अजित पवार यांना दिला. पण सर्वांना माहीत आहे की, पक्ष कोणी स्थापन केला. आमचा पक्ष शरद पवार आहेत आणि आमचं निवडणूक चिन्हही शरद पवारच आहेत. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय सूड बुद्धीने दिला आहे. आज शरद पवार आज चिन्हाबाबत निर्णय घेतील, असं अनिल देखमुख म्हणाले.

देशमुखांचा भाजपवर निशाणा

माझ्या मतदारसंघातील परडशिंगा येथे भाजपने एक महिला मेळावा आयोजित केला. हा त्यांचा अधिकार आहे. मात्र सरकारी अधिकारी खंड विकास अधिकारी यांनी सचिवांना पत्र पाठविलं तुम्ही लोकांना घेऊन या. शासकीय पत्र काढून हे सांगितलं जातं आहे. मेळावा भाजपचा आहे. मात्र त्या साठी खर्च सरकारकडून केला जाणार आहे. याची रीतसर तक्रार आम्ही करू. पक्षाच्या मेळावा साठी शासकीय यंत्रणेचा वापर आता पर्यंत झाला नाही, तो आता होत आहे, असं म्हणत अनिल देशमुख यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीत हालचाली वाढल्या

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत काल निर्णय आल्यानंतर राष्ट्रवादीत आता घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांचा मुक्काम दिल्लीतच असणार आहेत. दोन दिवस शरद पवार दिल्लीतच थांबणार आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रात परतण्याची शक्यता आहे. आज उद्या दिल्लीत थांबूनच पवार बैठका घेणार आहेत. पवारांसह सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि इतर पदाधिकारी राजधानी दिल्लीतच असणार आहेत. इथूनच पवार सूत्र हलवणार असल्याची माहिती आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.