महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत जायचं…; बच्चू कडूंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक

Bachhu Kadu on Prahar Meeting for Vidhansabha Election : आदार बच्चू कडू यांनी एक महत्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने आहे. याबाबत बच्चू कडू यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

महायुतीसोबत की महाविकास आघाडीसोबत जायचं...; बच्चू कडूंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक
बच्चू कडूImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 8:27 PM

नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात चर्चा होतेय ती विधानसभा निवडणुकीची… प्रादेशिक पक्ष विधानसभेला आघाडीसोबत असणार की युतीसोबत याचीही महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. अशातच प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलावली आहे. विधानसभा लढविण्या संदर्भात उद्या आमची मुंबईला मिटींग आहे. वीस ठिकाणच्या लोकांना आम्ही बोलावलेलं आहे. सगळ्यांसोबत चर्चा करून व्ह्यूव रचना आखली जाणार आहे. युतीसोबत किंवा आघाडी सोबत कसं जाता येईल किंवा व्यक्तिगत रित्या कसं लढता येईल? यावर आम्ही चर्चा करणार आहोत, असं बच्चू कडू म्हणाले.

आम्ही महायुतीसोबत आहोत याचा अर्थ असा नाही की आम्ही लढू नये. युतीसोबत असलो तरी आम्हाला लढणं गरजेचं आहे. आमची पार्टी आहे. आम्हाला हातपाय हलवणे गरजेचे आहे. आम्हाला राजकारण करावं लागेल. जागा लढवाव्या लागेल राजकीय पार्टीचा हा गुणधर्म असतो. या जागा संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही लढणार आहोत. पहिले आम्ही कसं लढणार काय लढणार हे ठरवू आणि आमचा अजेंडा सामान्य माणसाचा राहील, असं बच्चू कडू म्हणाले.

राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाला तर मला तर देणार नाहीत आणि दिलं तरी मी घेणार नाही. आलंच वाट्याला तर आमचे राजकुमार पटले यांना देऊ…आदिवासी आमदार आहे. आम्ही दोनच आमदार असताना मजबुतीने सोबत राहून काम केलं. राजकुमारने आमचा पक्ष मजबूत ठेवला त्यांना देऊ. फुटीचं कारण काय ते दोन दिवस वेळ द्यावा लागेल मी सगळ सांगेन, असं बच्चू कडू म्हणाले.

मी वाट पाहिली नाही. एनडीएकडून एक एक पाऊल पडत आहे. ते माझ्या सोईचं पडत आहे. एकूण विचार केला तर एनडीने सांभाळून घ्यायला हवं होतं. आम्ही ज्या पद्धतीने सोबत राहून मदत केली. एका वर्षात ते दिसून गेले आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावं लागलं, असं म्हणत बच्चू कडू यांनी एनडीएच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली आहे.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.