नागपूर शहर नवरीसारखं सजलं, या पाहुण्यांचं होणार आहे स्वागत; विशेष काय?

या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे प्लांटेशन करून त्यावर रंगीबेरंगी लाईट मारण्यात आले. नागपूर हे टायगर कॅपिटल असल्याने डोममध्ये एक मोठा वाघ साकारण्यात आला आहे.

नागपूर शहर नवरीसारखं सजलं, या पाहुण्यांचं होणार आहे स्वागत; विशेष काय?
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 6:56 AM

नागपूर : शहर जी 20 च्या निमित्ताने सर्वत्र सजला आहे. मात्र विदेशी पाहुण्यांना नागपूरच पहिलं दर्शन होणार ते नागपूर विमानतळाचं. त्यामुळे नागपूर विमानतळाला लाइटिंगच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सजविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नागपूर शहराला ग्रीन सिटी म्हटले जाते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारच्या वृक्षांचे प्लांटेशन करून त्यावर रंगीबेरंगी लाईट मारण्यात आले. नागपूर हे टायगर कॅपिटल असल्याने डोममध्ये एक मोठा वाघ साकारण्यात आला आहे. नागपूरच्या विमानतळावर जात असताना किंवा विमानतळावर पोहोचल्यानंतर आपण नागपूरच्या विमानतळावर नाही तर कुठल्यातरी प्रगत देशाच्या विमानतळावर आहो की काय असा भास झाल्याशिवाय राहत नाही. या संपूर्ण सजावटीचं सगळं डिझाईन केलं आहे ते आर्किटेक राजेश गोतमारे यांनी.

nagpur 2 n

विदर्भातील २५ संस्थांचा सहभाग

नागपूर शहराला मोठा वैचारिक वारसा लाभला आहे. याच शहरात जी-20 परिषदेअंतर्गत 20 ते 22 मार्च दरम्यान आयोजित होणाऱ्या जी-20 परिषदेच्या मंथनातून महत्वाचे विचार बाहेर येतील, असा विश्वास जी-20 आयोजन समीतीचे सूस शेरपा डॉ. स्वदेश सिंह यांनी आज व्यक्त केला. या परिषदेत नागपूर व विदर्भातील 25 संस्थाही सहभागी होणार आहेत. ‘नागपूर व्हॉईस’ उपक्रमाद्वारे जवळपास 40 संस्थांकडून सूचना प्राप्त झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

महत्त्वाचे विचार बाहेर येणार

जी-20 ची प्रारंभिक बैठक नागपुरात होत आहे. या परिषदेतून महत्वाचे विचार बाहेर येतील. 30 व 31 जुलै 2023 रोजी जयपूर येथे होणाऱ्या जी-20 परिषदेच्या शिखर परिषदेत सादर होणाऱ्या अंतिम प्रस्तावात हे विचार अंतर्भूत होतील, असा विश्वास डॉ. सिंह यांनी व्यक्त केला.

जी २० देशांचे ६० प्रतिनिधी येणार

जी-20 देशांच्या नागरी संस्थांचे जवळपास 60 प्रतिनिधी आणि भारतातील विविध नागरी संस्था आणि आमंत्रित देशांचे असे जवळपास 300 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत सहभागी होण्यासाठी नागपूर व विदर्भातील जवळपास 1000 संस्थांनी अर्ज केले होते. यापैकी 25 संस्थांची या परिषदेत सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

असा होईल समारोप

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 मार्च रोजी या परिषदेचा समारोप होणार आहे. जी -20 परिषदेत सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींसाठी 20 मार्च रोजी सायंकाळी फुटाळा येथे फाऊंटन शोचे आणि तेलनखेडी गार्डन येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 मार्च रोजी हे प्रतिनिधी पेंच व्याघ्र प्रकल्प आणि देवलापार गौ-संशोधन केंद्र, सेवाग्राम आणि पवनार येथे भेट देणार असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.